सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे आणि उपनेत्या वर्षा ठाकरे यांनी केली लसीकरण केंद्राची पाहणी
नागपूर, ता.५ : आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि फ्रंट लईन वर्कर यांच्या लसीकरणासोबतच केंद्र आणि राज्य शासनाच्या दिशानिर्देशानुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सोमवारपासून (१ मार्च) सुरूवात झाली.
यानिमित्त मनपा सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे आणि सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. ५) गांधीनगर येथील मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयाला भेट देउन ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाची पाहणी केली.
इंदिरा गांधी रुग्णालयात लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
यावेळी मनपा सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे व उपनेत्या वर्षा ठाकरे यांनी येथील संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली. तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना येत असलेल्या समस्यांबद्दल धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांना सूचना केल्या.
धरमपेठ झोन चे सभापती श्री सुनील हिरणवार,ज्येष्ठ नगरसेवक श्री संजय बांगले आणि अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी यांनी शुक्रवारी संध्याकाळी इंदिरा गांधी रुग्णालय येथे लस घेतली. मनपा तर्फे दोन पाळी मधे लसीकरण सुरु केले आहे. याची पाहणी साठी ते गेले होते. नागरिकांनी सुद्धा वेळ वाढविण्याचे निर्णयाचा स्वागत केले आणि दिल्या जाणारी सुविधेबद्दल मनपा चे आभार मानले.
प्रतिनिधी:- जयंत डोंगरे,कामठी(नागपूर)


0 टिप्पण्या