Advertisement

नागपूर महानगपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी ६ प्रतिष्ठानांवर कारवाई, करून रु. ४०,००० चा दंड वसूल

शुक्रवारी ६ प्रतिष्ठानांवर कारवाई

नागपूर, ता. १२ : नागपूर महानगपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता. १२ मार्च) रोजी ६ दूकाने प्रतिष्ठानांनवर कारवाई करुन रु. ४०,००० चा दंड वसूल केला.

यामध्ये वैशाली साडी सेंटर आणि निकम ज्वेलर्सवर लावण्यात आलेल्या प्रत्येकी रु. १०,०००/- दंड समाविष्ट आहे. पथकानी ७१ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

प्रतिनिधी:- जयंत डोंगरे,नागपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या