Advertisement

क्रांतीदेवी सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त म.न.पा.तर्फे अभिवादन

क्रांतीदेवी सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त म.न.पा.तर्फे अभिवादन

नागपूर,ता.१० :क्रांतीदेवी सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त सुभाष उद्यान,फुले मार्केट स्थित प्रतिमेला मा.महापौर श्री. दयाशंकर तिवारी, मा.उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे व प्रभागाच्या नगरसेविका श्रीमती हर्षला साबळे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी ‍ अखिल भारतीय माळी महासंघाच्या सरचिटणीस सौ.स्नेहा साखळे, संजय साखळे, क्रान्ती ढोक, राजकुमार वंजारी,डॉ.संतोष मोदी उपस्थित होते.

तसेच म.न.पा.मुख्यालयात महापौर कार्यालयातील सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राला मा.महापौर श्री.दयाशंकर तिवारी, उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

यावेळी माजी महापौर व माजी आमदार प्रा.अनिल सोले,स्थायी समिती सभापती श्री.प्रकाश भोयर,सत्तापक्ष नेते श्री. अविनाश ठाकरे, कर आकारणी समिती उपसभापती श्री.सुनिल अग्रवाल,कार्य.अभियंता श्वेता बॅन

प्रतिनिधी :- जयंत डोंगरे,नागपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या