उन्हाळ्यात येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी जलप्रदाय समितीने दक्ष रहावे:जलप्रदाय समिती सभापती संदीप गवई अवैध नळ कनेक्शन कापण्याचे सभापतींनी दिले निर्देश
नागपूर, ता.१० : उन्हाळा सुरू होत आहे. उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाई भासू नये यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या जलप्रदाय विशेष समितीने दक्ष रहावे, असे आवाहन जलप्रदाय समितीचे नवनिर्वाचित सभापती संदीप गवई यांनी केले आहे.
बुधवारी (ता. १०) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये जलप्रदाय समितीचे सभापती संदीप गवई यांनी उन्हाळा २०२१ ची पूर्वतयारी यासंदर्भात आढावा बैठक घेतली.
बैठकीत माजी स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, जलप्रदाय समितीच्या उपसभापती सरला नायक, जलप्रदाय समितीचे सदस्य सर्वश्री लहुकुमार बेहते, भुट्टो अहमद, दिनेश यादव, सदस्या मनिषा कोठे, जयश्री वाडीभस्मे, शिल्पा धोटे, वैशाली नारनवरे, कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, ओ.सी.डब्ल्यू. चे अधिकारी, दहाही झोनचे डेलीगेट, उपस्तिथ होते .
प्रतिनिधी:- जयंत डोंगरे,नागपूर



0 टिप्पण्या