मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे निर्देश : टास्क फोर्स कमिटीची बैठक
खासगी रुग्णालयांचा ‘कोव्हिड ट्रिटमेंट प्रोटोकॉल’ तपासा
नागपूर,ता. १० : कोव्हिड संदर्भात शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांच्या पाच दिवसाचा ‘कोव्हिड ट्रिटमेंट प्रोटोकॉल’ तपासून त्याचा अहवाल लवकरात लवकर सादर करा, असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले.
नागपूर महानगरपालिकेच्या कोव्हिड संदर्भात टास्क फोर्स कमिटीची बैठक बुधवारी (ता. १०) मनपा मुख्यालयातील ‘कोरोना वार रूम’मध्ये पार पडली.
बैठकीला अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता अजय केवलिया,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, टास्क फोर्स समितीचे सदस्य डॉ. मिलींद भ्रुशुंडी, डॉ. प्रशांत जोशी, डॉ. अशोक जाधव, डॉ.उदय
प्रतिनिधी:- जयंत डोंगर,नागपूर


0 टिप्पण्या