Advertisement

परम् पुज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर उर्दु उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वितरण

शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वितरण

कामठी २२ मार्च येथील नगर परिषद परम् पुज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर उर्दु उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वितरण नगरसेविका संध्या रायबोले यांच्या हस्ते मुख्याध्यापक सखावत अली यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

कोविड-१९ विषाणू च्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना पोषण आहार शिजवून न देता धान्य स्वरूपात देण्याचे शासन निर्देश आहेत, त्या नुसार विद्यार्थ्यांना पोषण आहार चे वितरण करण्यात आले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिति चे अध्यक्ष मुन्नवर हुसेन आणि शिक्षक वकार अहमद, मोइन अख्तर, जाहिद अनवर, तबस्सुम निजामुद्दीन, अर्शिया फिरदौस, यास्मीन जोहरा,नुर पैकर,मुश्तरी बेगम उपस्थित होते.

प्रतिनिधी:- जयंत डोंगरे,कामठी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या