Advertisement

जेएन रोड कन्हान येथील हार्दिक मंगल कार्यालय मध्ये महिलांच्या आपुलकीचा हळद-कुंकुचा कार्यक्रम संपन्न

जेएन रोड कन्हान येथील हार्दिक मंगल कार्यालय मध्ये महिलांच्या आपुलकीचा हळद-कुंकुचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,
त्यात स्नेह परिषद आणि हळदी-कुंकू कार्यक्रमात 500 हून अधिक महिलांनी उपस्थिती दाखवली आणि महिला मुलींनी नृत्य व गीत सादर केले.
अनेक विषयांवर थीम ठेवली गेली अशा विषयांचे प्रकार ज्यामध्ये महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
रोकडे ज्वेलर्सच्या वतीने पुरस्कार वितरीत करण्यात आले,

सर्व महिलांची नावे व मोबाईल क्रमांक लिहून सर्व लोकांसमोर लकी ड्रॉ काढला गेला.

यामध्ये लकी विजेत्या स्नेहा पाली, कन्हान यांना दोन ग्राम सोन्याची नथ देऊन पुरस्कृत करण्यात आले.
जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे नगरपालिका अध्यक्षा करुणा ऑस्टनकर, लाखेश्वरी काळे, महिला आघाडी अध्यक्ष कॉंग्रेस रीता बर्वे, नंदा लोहबरे, स्वाती पाठक, मनीषा कापसे, चंदा माकडे, विशाखा ठमके, वर्षा लोंडे, अनिता पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी आपल्या भाषणात महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या रोजगाराविषयी व आगामी महिला बचत गटातील कन्हान सखी मंचच्या महिलांनी नेहमीच सहकार्य करण्याचे सांगितले.

स्नेह मिलन या कार्यक्रमात मंचातील सर्व महिला नीतू तिवारी यांनीही ग्रामीण भागात नव्हे तर नागपूर जिल्ह्यापर्यंत कन्हानचे नाव जिल्ह्यात असावे यासाठी सखी मंच तयार केला.
माया तिवारी, उषा पोटभरे, सोफिया शेख, दुर्गा कोचे, ममता दास, कुंदा मोटघरे, रीना चौरसिया इंद्रा कुर्मी, शुष्मा मस्के, वैशाली खंडार, उषा साकोरे, वैशाली थोरात, वैशाली बेलनकर, सुनीता दुबे माया नामदेवी आदीं महिलांनी योगदान दिले. उके आणि आंजू जाधव यांचे आभार मानण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या