PWD चे इंजिनियर मार्फत झालेल्या चुकीचा पाहणी नुसार कन्हान नदीला आलेल्या महापुरातील काहीनागरिकांना नुकसान भरपाई न मिळाल्याबाबत.
पत्राद्वारे कळविण्यात आले आहे होते कि, दिनांक २८/०८/२०२० रोजी पेंच धरणाचे पाणी कन्हान नदीचा पात्रात सोडण्यात आले होते त्यामुळे नगर परिषद कन्हान-पिपरी अंतर्गत पिपरी, धरम नगर, सत्रापूर, सिहोरा या भागात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाला होता त्यामुळे अनेक पुरग्रस्त नागरिकांना आर्थिक नुकसान झालेला आहे.
कन्हान नदीला आलेल्या महापूरात पूरग्रस्त नागरिकांच्या घरांची तलाठी व PWD चे इंजिनियर मार्फत त्यांचा नुकसानाची पाहणी करण्यात आली होती. परंतु PWD चे इंजिनियर मार्फत लाभार्थींचा घरांचे मूल्यनिर्धारण (Valuation) चुकीचे काढण्यात आले त्यामुळे खरे लाभार्थीना त्यांचा लाभ मिळाला नाही.
तसेच पूरग्रस्त लाभार्थी ज्यांचे संपूर्ण घर जमीनदोस्त झालेले आहे त्यांना त्यांचा कोणतीही नुकसान भरपाई देखील मिळालेली नवती.
पूरग्रस्त लाभार्थीना त्यांचा झालेल्या संपूर्ण खर्चाची पूर्तता लवकरात लवकर सरसकट करण्यात यावी करण्यात यावी तसेच पूरग्रस्त नागरिकांच्या घरांची पुन्हा मौका चौकशी करण्यात यावी.
अन्यथा तहसील कार्यालय पारशिवनी समोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल यांची नोंद घ्यावी. कारीता पत्र सादर करण्यात आले होते.
तहसीलदार पारशिवनी यांना कार्यवाहीस सविनय सादर करण्यात आले होता .
उर्वरित पूरग्रस्तचा मौका चौकशी कण्यात आली.
कन्हान मधील पिपरी व धरम नगर पूर ग्रास्तांचा पुन्हा सर्वे करण्यात आला सुटलेल्या लाभार्ठीयांचा नाव नोंदणी करण्यात आली
प्रामुख्याने उपस्तीथ
तलाठी क्षीरसागर,
मंडळ अधिकारी मेश्राम,
PWD इंजिनिअर आशिष गजभिये
नगराध्यक्षा कन्हान-पिपरी नगर परिषद सौ.करूना आस्टनकर,
मनीषा चिखले, शुभांगी घोगले, कोमल लांजेवार,लीना हारोडे,
शहर प्रमुख छोटू राणे, भारत पगारे, हरिष तिडके, मौका चौकशी दरम्यान उपस्तीत होते.


0 टिप्पण्या