Advertisement

महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट मनसर-कांद्री येथील कर्मचाऱ्या वर होणाऱ्या अत्याचारा विरोधात कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन

रामटेक/मनसर-कांद्री :- महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट कांद्री येथील कर्मचाऱ्या वर होणाऱ्या अत्याचारा विरोधात कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन

चेक पोस्ट येथे सदभावना प्रा.लि. कंपनीच्या कामगार विरोधी नितीमुळे चेक पोस्ट येथील कर्मचाऱ्यांनी आज दिनांक 0 1 फेब्रुवारी 202 1 रोजी शिवसेना रामटेक तालुकाच्या वतीने कामबंद आदोलन केले.

कर्मचाऱ्यांना वेळेवर पेमेंट मिळत नसल्यामुळे तसेच त्यांच्या भविष्य निधि चा पैसा कंपनी जमा करीत नसल्यामुळे , कर्मचाऱ्यांच्या , पगारवाढी करीता तसेच बोनस मिळावा याकरीता माननिय आमदार आशीषजी जायसवाल ,यांच्या नेतृत्वात सदभावना इंजिनियरिंग कंपनिच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले जो पर्यंत कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविल्या जानार नाही तोपर्यंत काम बंद व चेक पोस्ट बंद राहील असे यावेळी माननिय आमदार श्री आशीषजी जायस्वाल यांनी सदभावना कंपनिच्या अधिकाऱ्यांना सांगीतले.

आमदार आशीषजी जायस्वाल नि  चेकपोस्ट ची पाहनी केली असता प्रवेश गेटवर लोह्याचे पाईप तुटलेले आढळले यामुळे टूकचे टायर फुटण्याची शक्यता आहे. तसेच बॅरीकेट तुटलेले आढळले रोडवर मोठे खड्डे पडल्यामुळे टूक केव्हाही पलटू शकतो. त्यामुळे अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले समस्या चे समाधान न झाल्याने साखळी उपोषनावर बसण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

सदभावना कंपनिच्या वतीने श्री मृत्युंजय पिंपळापूरे उपस्थित होते.

तसेच जिल्हा परिषद सदस्य श्री संजयजी झाडे श्री कमलेश शरणागत , शिवसेनेचे तालुका प्रमुख श्री . विवेकजी तुरक ग्रामपंचायत सदस्य श्री रवि कठौते, ग्रा.प.सदस्य श्री मंगेश ठाकरे श्री प्रविण धुमाळ. श्री शैलेष पाटर श्री राष्ट्रपालजी खोब्रागडे, श्री मधु ठाकरे, श्री छन्नु नागदेवे, श्री देवेद्र मडावी, उद्देश कठौते , सनि कठौते., शैलेश उईके ,अक्षय कोल्हे, राजाबाबु कठौते व

मोठ्या संख्येने सदभावना इंजिनियरींग कंपनीचे कर्मचारी व शेकडो शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते

प्रतिनिधी :- भारत पगारे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या