पारशिवनी/कन्हान: जम्मू-कश्मीर च्या पुलवामा जिल्ह्यात
पूलवामा शहीद दिवस
14 फेब्रुवारी 2019 मध्ये पूलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व शूर जवानांना कन्हान शिवसेना संघटने तर्फे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवाजी नगर कन्हान येथे भारत मातेचा फोटोला माल्यार्पण करून शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
प्रामुख्याने उपस्थित शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले, नगराध्यक्षा करुणा आष्टणकर, नगरसेवक डायनल शेंडे, नगरसेवक अनिल ठाकरे, शिवसेना कन्हान शहर प्रमुख छोटु राणे, भारत पगारे, चिंटू वाकुडकर, पवन ठाकूर, अजय चव्हाण, हरीश तिडके, सचिन सहारे, अश्विन बाते, शाहरुख खान, नितीन पाठक, चेतन खेरडे, वैभव तिडके, देवानंद साकोरे, संजय कश्यप, मनीष सोळंकी, शैलेश दिवे, शिव कुरील, कु.पंखुडी पाठक व सर्व कन्हान शिवसैनिक व मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक उपस्थित होते.

या अत्यंत निंदनीय घटनेला दोन वर्ष पुर्ण झाल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी शहिद चौक येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करुन शहिद स्मारका वर हार माल्यार्पण व पुष्प अर्पण करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या सीआरपीएफ च्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलि दिली .
१४ फेब्रुवारी २०१९ ला जम्मू-काश्मीर च्या पुलवामा जिल्ह्यात जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील लेथापोरा या अवंतीपोराजवळ असलेल्या ठिकाणी केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्सच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या सुरक्षा दलांच्या वाहनांच्या एका ताफ्यावर दुपारी च्या सुमारास ३ वाजुन १५ मिनटांनी एका आत्मघाती हल्लेखोराने आपल्या वाहनासकट हल्ला केल्याने भारतीय सीआरपीएफ चे ४० ते ४४ जवान शहिद झाले होते.
या अत्यंत निंदनीय घटनेला दोन वर्ष पुर्ण झाल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी शहिद चौक येथे शहिद स्मारकावर हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या सीआरपीएफ च्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलि दिली.
याप्रसंगी तारसा रोड येथे शहीद स्मारक समोर श्रादांजली अर्पण करण्यात आली प्रवीण गोडे,रुषभ बावनकर,प्रदीप बावने,संजय रंगारी,हरीओम प्रकाश नारायण,सोनु खोब्रागडे,प्रकाश कुर्वे,सुषमा मस्के,प्रवीण माने,निलकंठ मस्के,अखिलेश मेश्राम,दिपचंद शेंडे ,शाहरुख खान सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते


0 टिप्पण्या