Advertisement

मनसर-कंद्री माईन रेल्वे क्रॉसिंग जवळ वाढत असलेला अपघात थांबवण्यासाठी ग्रा.पं.सदस्य रवी कठौटे व सर्व नागरिकांनी रुळावरून पूल व सर्व्हिस रोड त्वरित बनवण्याची मागणी केली आहे.

रामटेक:- मनसर-कंद्री माईन पासून जवळपास २कि.मी.अंतरावर रेल्वे क्रॉसिंग जवळ घडत असलेला आघात दिवसेंदिवस वाढतच आहे.

मनसर-कंद्री माईन २ कि.मी. एम मी रेल्वे क्रॉसिंगजवळ मोठा अपघात 24 जानेवारी रोजी हा आघात झाला आणि ह्या आघातात जिल्हा शिवणी मधील बिचुवा छुरवाडा गाव येथील सुमरण दादुलाल असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ह्या अपघातात नवरा-बायको दोघांचा मृत्यू झाला.

कंटेनर ट्रकशी समोरासमोर झालेल्या भिडत मध्ये मागील अपघातात 2 व्यक्ती मृत्यू झाले होते. आतापर्यंत सर्व्हिस रोड आणि रेल्वे रुळावरून अद्यापही ओव्हर ब्रिज नसल्यामुळे 4-5 लोकांचा बळी गेला आहे.

गावातील लोकांना सरळ रोडवर यावे लागते याच कारणास्तव रेल्वे क्रॉसिंगजवळ अपघात मोठ्या प्रमाणात होत आहे.

काही दिवसांपूर्वी रेल्वेची रेलगाडी नसल्याने कार गाडीला धडकली.

ग्रामपंचायत सदस्य रवी कठौटे व सर्व नागरिकांनी रुळावरून पूल व सर्व्हिस रोड त्वरित बनवण्याची मागणी केली आहे.
गावकरी लोकांना व जवळपासच्या जनतेला मोठा प्रश्न निर्माण होत आहे कि कधी हा बळीचा खेळ थांबणार.

प्रतिनिधी:- भारत पगारे

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या