गोगलगाव (अहमदनगर):- शिर्डी पासून २०किमि वर गोगलगाव येथे राहणारे गुळवे कुटुंबीय सध्या विषमुक्त अन्नधान्य व भाजीपाला पूर्णपणे विश्मुक्तच होऊन ग्राहक पर्यंत कसा पोहचेल या कडे काटेकोर पने लक्ष देत आहे. सेंद्रिय शेती करतांना गुळवे कुटुंबीय स्वता पारंपारिक जीवन शैलीचा वापर करीत आहेत. घरच्या वापरातील भांडी हि खापर ,माती ,पितळ ,तांबे, कास्य इत्यादी धातूची बनवलेली आहेत.
दंत मंजन म्हणून अग्निहोत्र भास्मापासून बनवलेल्या दंत मंजन चा वापर ते करतात. व्यवहारिक नियोजानाबारोबाराचा देशी गायीच्या शेन-गोमूत्रापासून वेगवेळ्या निविष्ठा बनवून स्वतःच्या कुतुम्बासोबाताचा ग्राहक वर्गा साठी गट शेतीच्या माध्यमातून विषमुक्त भाजीपाला व अन्नधान्य पिकवित आहेत. त्यांच्या उत्पादनाला मोठ्या शहरातून प्रचंड मागणी आहे.
रासायनिक खतांच्या अति वापरामुळे सामान्य लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. या कडे शेतकरी वर्ग उघडपणे डोळेझाक करतो आणि या मध्ये आरोग्याची हानी होते. हे कुणाच्याच लक्षात येत नाही. त्या दृष्टीने गुळवे कुटुंबीयांनी विश्मुक्त भाजीपाला पिकाव्ण्यासाठीचे उचललेले हे पाउल खरोखर कौतुकास्पद आहे.
“अन्न धन्य स्वस्त घेण्यापेक्षा विषमुक्त अन्नधान्य व भाजीपाला खा व निरोगी राहा” असे निरोगी राहा म्हणजेच स्वस्थ राहा असे गुळवे यांचे म्हणणे आहे.त्यांच्या या उपक्रमाला ग्राहक वर्ग कडून उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.त्याच बरोबर ‘शेतकरी दादा’ अशी प्रेमळ हाक व आमचे ‘अन्नदाते’ असे संबोधन गुळवे यांना दिले जाते.
२० वर्षे नोकरीत कार्यरत असलेले श्री. गुळवे यांनी आपल्या आजोबांच्या कर्करोगाने झालेल्या निधनामुळे नोकरी सोडून सेंद्रिय शेती कडे वळण्याचा निर्णय घेतला आणि त्याच अनु शन्घाने गेली ५ वर्षे ते विषमुक्त अनन्धान्य पिकवित आहेत.वारंवार तणनाशक आणि रासायनिक खतांचा बेसुमार वापर यामुळे जमिनीतील गांडूळ मरण पावतात परिणामी जमिनीचा पोत खराब होतो असे गुळवे सांगतात. शेतकर्याला शेती परवडत नाही हे म्हणणे साफ चुकीचे असल्याचे गुळवे यांचे मत आहे.
ग्राहक वर्गाच्या आरोग्याला पोषक अन्नधान्य व भाजीपाला मार्केट मध्ये नक्कीच विकला जाणार त्यामुळे तो विषमुक्त भाजीपाला शेतकर्यांनी जर पिकवला तर तो आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकतो. कारण गुळवे यांचा दर आठवड्याला दोन ते अडीच टन माल शहरात विक्री साठी पाठविला जातो. गुळवे कुटुंबीयांनी शेतीतून आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन स्वतःचे प्याकिंग हाउस बांधले व तेल घाना व दालमिल खरेदी केली.
झिरो बजेट,नैसर्गिक ,जैविक आणि सेंद्रिय शेतीचे वेगवेगळे ट्रेनींग घेऊन स्वतःचे शेतीचे मॉडेल तयार केले आहे. त्याच्या २० गुंठ्याच्या शेती प्लोट मध्ये एका कुटूंबा साठी लागणारा भाजीपाला पिकवण्याचे मॉडेल त्यांनी तयार केले आहे. या मध्ये अंजीर,पपई, चिकू,नारळ ,रताळे, जांभूळ, गवती चहा, हळद,आंबा, द्राक्षे,अन्नानसा,शेवगा,इत्यादी पिके आणि अंतर पिके, असून परसबागेत पालक, मेथी,मुळा,गाजर, कांदेपात ,यासारखा भाजीपाला पिकविला देशी केळी पिकवण्यासाठी गावरान गाईची गोवारी जाळून केलेल्या धुरा मध्ये केली पिकविल्यास चागली चवदार केळी खायला मिळते असे गुळवे आवर्जून सांगतात.
गुळवे कुटुंबीय त्याच्या पेरूच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. साधारण दिड एकराच्या परिसरात त्यांनी पेरूची लागवड केली असून ग्राहकांना वर्षभर पेरू खायला मिळावा यासाठी नियोजन करून पेरूच्या बागेचे चार भाग केले आहेत. पेरूच्या बागेत कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत न वापरता देशी गायचे शेन+गोमुत्र +गुल+ताक यांचा मिश्रानापासुना बनवलेले जीवामृत आणि साजीवामृत यांचे फवारणी केली जाते तसेच पेरूच्या बुध्याशी देशी झेंडूची लागवड केली. त्यामुळे झेंडू मधील alfamithin या घटकामुळे पेरूच्या झाडांच्या मुळांची मुल्कुज थांबविता येते. बागेतील तन काढण्यासाठी तन नाशक न वापरता ग्रास कटर चा वापर केला जातो.
गुळवे यांनी निंबोळी अर्क पपई अर्क,तसेच लिंबू व चीचे चा अर्क, बनविलेले आहेत. कार्ल्यापासुन विशिष्ट प्रकारचे एन्झाइम बनवलेले आहेत. दशपानी अर्काचा कीटक नाशक म्हणून फवारणी साठी उपयोग होतो. आपल्या सभोवतालच्या उपलब्ध साधन समृग्री पासून शेतीसाठी उपयुक्त असे सत्र ते अठरा प्रकारचे फार्मुले बनविलेले आहेत.
पेरू +गुळ ३ महिने कुजवून त्याचे एन्झाइम फवारले तर फळाची साईझ वाढविण्यास मदत होते या सगळ्या प्रकारचे फोर्मुला बनविण्यासाठी एकरी ४० रुपये पेक्षा जास्त खर्च येत नसल्याचे गुळवे आवर्जून सागतात आणि तोच खर्च रासायनिक खतांसाठी एकरी १३०० /- पर्यंत करावा लागतो.
गुळवे यांच्या शेतीतील ४१९ हा देशी उस गोकृपामृत कल्चर चा वापरणे ९ महिन्यात परिपक्व झाला आहे. आणि या साठी एकरी १००/- रुपयें पेक्षा जास्त खर्च आलेला नाही. देशी गायींच्या संगोपानामुळे गो आधारित शेती तसेच मुबलक प्रमाणात दुध,तूप,दही यावर त्यांच्या कुटुंबियांचे संगोपन होते. असे गुळवे सांगतात. त्याच्या कडील आटाचाक्कीवर थंड पीठ निघते,व या पिठाला जात्यावर निघणार्या पिठाची चव असते.
त्याच्याकडील लाकडी घाण्यावर शेगदाणा,तिल,खोब्रे,करडई,जवस,खुरासणी यांचे तेल काढले जाते. आणी कोलेस्ट्रोल वाढविणाऱ्या रीफइंड तेलाच्या जागी गुळवे यांच्या लाकडी घाण्याच्या तेलाला प्रचंड मागणी आहे. आपल्या शेंद्रिय शेतीबद्दल समाधान व्यक्त करतांना श्री गुळवे समस्त शेतकरी वर्गाला विषमुक्त शेती करण्याचे आवाहन करतात.
प्रतिनिधी :- सौ.मनीषा पवार


0 टिप्पण्या