कन्हान:- कामठी ओपन कास्ट माईन (WCL)च्या ब्लास्टिंग मुळे कन्हान शहर व जवळपासच्या गावाला बसत आहे जोरदार हादरा.
मागील काही आठवड्यापासून कन्हान लागत असलेल्या कामठी ओपन कास्ट माईन च्या ब्लास्टिंग मुळे, ८०% लोकांच्या घराला हादरा बसत आहे.
त्यात लोकांचे मालकी हक्काचे घर जीर्ण अवस्थेकडे पलायन करीत आहे, कन्हान हे शहर छोटे नसून नगर परिषद असलेले ६० हजार लोकवस्तीचे दाट शहर आहे.
कोळसा खाणीच्या जवळपास असलेले घर हे एवढ्या जोरात हादरा बसत आहे कि त्यांच्या घरचे भांडे खाली पडायला लागल्याने खळबळ जंक वातावरण निर्माण झाला आहे.
कन्हान शहर च्या जवळील नगरराय नगर ,सुरेश नगर,अशोक नगर,धरम नगर, व पिपरीचा परिसर हा सर्वात मोठ्या प्रमाणात हादरा बसत आहे.
शिवसेना कार्यकर्त्यांचा एक शिष्ट मंडळांनी कमठी माईन च्या sab-area ला भेट दिली व ब्लास्टिंग थांवण्यास सांगितले व कन्हान मधील ब्लास्टिंग ची स्वस्था सविस्तर सांगितले व जवळ पवास २ ते ३ तास चर्चा करून समस्यांवर तोडगा काढण्याचा सुचाव सुचविले.
चर्चा केलेले विषय :-
१)ब्लास्टिंग थांबविणे,
२) भूजलसाठा सुरक्षित ठेवने.
३)पिपरी गावाला,खदान च्या माती डम्पिंग मूळे धूळ प्रदूषण थांबण्यासाठी, पाण्याचा फवारणी सत्तात सुरु ठेवण्या करिता सूचित करण्यात आले.
शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख, श्री वर्धराज पिल्ले प्रामुख्याने असून शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी खालील प्रमाणे:-
सुनील पिल्ले,भारत पगारे,छोटू राणे,उमेश पौनीकर,एत्तद्देश्यम सय्यद,हरीश तिडके,अभिलाष पिल्ले, राजेश मांडरे,उमेश आकोने,समीर मसराम. इत्यादी मान्यवर उपस्तिथ होते.



0 टिप्पण्या