Advertisement

रामटेक येथील संत गाडगे महाराज पुण्यतिथि निमित्य स्मारक मूर्ति ला माल्यार्पण करून! मानवंदना देण्यात आली

रामटेक:- अंधश्रद्धा आणि अस्वच्छता यांनी बूरसटलेल्या समाजाला कीर्तन आणि भजनासारख्या माध्यमातून  समाजसुधारणा करणारे श्री संत गाडगे महाराज  पुण्यतिथि निमित्ताने आज गांधी चौक रामटेक येथील संत शिरोमणि  गाडगे महाराज यांचे स्मारक येथे संत गाडगे महाराज यांचा मूर्ति ला माल्यार्पण करुन परिट धोबी समाज रामटेक, नगरपरिषद रामटेक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था बार्टी,पुणे व अन्य सामाजिक संस्था रामटेक चा वतीने अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रामुख्यानी रामटेक नगरातील प्रथम नागरिक श्री. दिलीप जी देशमुख नगराध्यक्ष न.प रामटेक,

श्री.राजूजी भोस्कर जिल्हाध्यक्ष परिट धोबी समाज सेवा मंडळ नागपुर,

श्री संजयजी मुलमुले, माजी नगरसेवक श्री अनिलजी वाघमारे,माजी नगरसेवक श्री अरुणजी भिलकर,अध्यक्ष संत गाडगे बाबा सेवा समिति रामटेक श्री बबन श्रीरसागर माजी नगरसेवक

श्री जयेंद्र भिलकर अध्यक्ष रामटेक तालुका परिट धोबी समाज सेवा मंडळ तथा

सदस्य ग्रा.प आजनी, नितिन बंडीवार संघटक रामटेक तालुका परिट धोबी समाज सेवा मंडळ तथा सदस्य ग्रा.प खैरी बिजेवाड़ा,

सौ.शुभांगीताई भोस्कर ,सरपंच ग्रा. प आमडी,अरविंद खेड़कर, विलास भिलकर, दीपक भिलकर,

सौ. जयश्री भिलकर,

सौ शोभना श्रीरसागर,

मोनू रघुवंशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था बार्टी,पुणे यांचे समतादूत

श्री. राजेश राठोड़ सर, दुर्योधन बगमारे,ओमकार डोले तसेच इतर समाजसेवी संस्थेचे पदाधिकारी जे संत गाडगे बाबाचा विचाराला मानतात

श्री.आष्टणकर सर, विणुधर भीमटे सर, राहुल जोहरे सर, जितेंद्र बळनाथ इत्यादि समाजसेवक उपस्थित होते.

तसेच काही प्रमुख पाहुण्यानि संत गाडगे बाबा यांचा विषय संबोधन केले संचालन

श्री.आष्टणकर सर यांनी केल व आभार नितिन बंडीवार यांनी केल.

प्रतिनिधि:-  भारत पगारे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या