Advertisement

कन्हान मध्ये संत गाडगेबाबा यांच्या ६४ व्या पुण्यतिथी निमीत्य हिराबाई शाळेत पुण्यतिथी निमित्य मानवंदना देण्यात आली

कन्हान:- संत गाडगेबाबा ६४ व्या पुण्यतिथी निमीत्य हिराबाई शाळेत कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान:- संत गाडगेबाबा 64 व्या पुण्यतिथी निमीत्य हिराबाई उच्च व प्राथमिक शाळेचा प्राणांगात मधे शाळेचे संचालक नरेंन्द्रजी वाघमारे यांचा मार्गदर्शनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

संत गाडगेबाबा पुण्यतिथी कार्यक्रमात प्रमुख उपस्थीती नागपूर जिल्हा किसान अध्यक्ष ओमप्रकाश काकडे,माझी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अध्यक्ष प्रशांत बाजीराव मसार ,नगरसेविका रेखाताई टोहणे, हिराबाई शाळा वसतिगृह अधिक्षक गणेश रामापूरे यांचा हस्ते सर्वप्रथम संत गाडगेबाबा प्रतिमाचे पुजन करूण पुष्पहार, पुष्पगुच्छ माल्यार्पण,अर्पित कर सामुहिक विनम्र अभिवादन करण्यात आले.

ह्या प्रसंगी प्रमुख अतिथी ओमप्रकाश काकडे ,प्रशांत बाजीराव मसार,रेखा टोहणे यांनी संत गाडगेबाबाचां जिवनावर मार्गदर्शन करीत स्वच्छता अभियानाचा नारा दिला तथा कार्यक्रमाचे प्रास्तविक संभाषण जेष्ठ नागरीक दिलीपजी सायरे व अभार प्रदर्शन गणेश रामापूरेनीं व्यक्त केले. ह्या कार्यक्रमात चंदन मेश्राम,अमोल साकोरे, प्रदीप बावणे ,दिपक तिवाडे, पकंज गजभिए, निलेश सायरे इत्यादी उपस्थीत होते.

प्रतिनिधी:- भारत पगारे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या