Advertisement

क्षेत्राचे आमदार श्री आशिष जैस्वाल यांच्या हस्ते दि.०५-११-२०२०ला कृषी उत्पन्न बाजार समिती,रामटेक येथे धान खरेदी व विक्री करीता,काटापूजन करून शुभारंभ.

दि.०५-११-२०२० रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती,रामटेक येथे धान खरेदी-विक्री करीता काटापूजन करुण  शुभारंभ.

रामटेक विधानसभा क्षेत्रातील धान खरेदी केंद्राला मंजुरी

जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या सोबत आमदार श्री आशिष जयस्वाल

यांनी दि.०२-११-२०२० धान खरेदी-विक्री केंद्र सुरु करण्या बाबत चर्चा केली होती.

दि. ०४-११-२०२०ला केंद्र शासनाच्या आधारभूत खरेदी किंमत योजना अंतर्गत

हंगाम २०२०-२१ करिता रामटेक विधानसभा क्षेत्राअंतर्गत धान खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी मार्फत मंजुरी देण्यात आली.

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी यांच्या मार्फत रामटेक तालुक्यात रामटेक तालुका सहकारी खरेदी-विक्री समिती मार्फत

बाजार समिती, रामटेक,पारशिवनी तालुक्यात पारशिवनी बाजार समिती व डुमरी तसेच

मौदा तालुक्यातील कल्पना सहकारी राईस मिल सोसायटी लिमिटेड महादुला मार्फत महादुला, रेवराल, निमखेडा, चाचेर व अरोली येथे धान खरेदी केंद्र सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

त्याच प्रमाणे रामटेक तालुक्यातील आदिवासी क्षेत्रात आदिवासी विकास महामंडळ,उप-प्रादेशिक कार्यालय,रामटेक मार्फत पवनी,आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देवलापार मार्फत बांद्रा व बेलदा(टुयापार),आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था भंडारबोडी मार्फत बेंडेपार (भंडारबोडी) खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत देखील मंजुरी देण्यात आलेली आहे.

सर्व शेतकऱ्यांनी आपले धान विक्री करावी असे आवाहन रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. आशिष जयस्वाल यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

प्रतिनिधि:-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या