कन्हान रेल्वे सायडिंग च्या माथाडी कामगारांचे दयनीय हालत
रामटेके क्षेत्राचे आमदार श्री आशिष जैस्वाल यांनी संतप्त माथाडी कामगार वर्गाला भेट देऊन त्यांचे होणारे हाल सुधारण्यासाठी कटिबद्ध वचन देऊन, आनंदाचे वातावरण निर्माण केले. आमदार आशिष जैस्वाल यांनी स्तब्ध माथाडी कामगारांचे ऐकून त्यांच्या समस्यांवर लवकरात लवकर उचित कार्यवाही करून त्यांना, त्यांच्या कामावर लवकरात लवकर रुजू करू असे स्पष्ट उत्तर दिले .. व संपूर्ण कन्हान सायडिंग ची पाहणी करून कामगारांशी चर्चा केली.
कन्हान रेल्वे स्टेशन च्या माथाडी कामगारांचे हालत इतकी गंभीर प्रकारे समोर अली आहे कि दोघाच्या वादात माथाडी कामगार फसून बसलेत..आहे
दोघे म्हणजे एक ते ज्यांना ट्रेनच्या रॅक खाली करावयाचा ठेका मिळाला ते (ट्रान्सपोर्टर) व एक ते ज्यांच्या ट्रक!… (ट्रान्सपोर्टर) च्या ठेक्यात लावलेले असतात.. असे त्यांच्या आपसी मतभेद मध्ये..असल्यानी कन्हान रेल्वे रॅक ही आता नागपूर च्या जवळील कळमना रेल्वे च्या सायडिंग ला लावली जात आहे. त्यामुळे कन्हान सायडिंग चे माथाडी कामगारांना बेरोजगारीचा सामना कराव लागत आहे.. अगोदरच कोरोना महामारीने लोकांचे जनजीवन अस्तव्यस्त केले आहे. त्यात जयांचे चालू काम हाताच्या बाहेर जात आहे … ४०० लोकांचा माथाडी वर्ग आहे. व त्याच्या वर इतर छोटेमोठे दुकानदार निर्भर आहेत व आपला उदार निर्वाह करत होते.पण हे काम तब्बल दोन महिन्यापासून बंद आहे. व इथले काम किव्वा इथली मालधक्यावर लागणारी मालगाडी आता कळमना सायडिंग ला लागत असल्यानी माथाडी वर्गाचा संताप टोकाला येऊन पोचला आहे.
त्यांना हेच कडेना कि आम्ही आमच्या समस्या कोणाला सांगावं? हे त्या बेरोजगार झालेल्या माथाडी मजुरांना कडे ना ते माथाडी कामगार १ व २ नसून तब्बल ४०० लोकांचे परिवार त्या मालधक्यावर निर्भर आहे. पण कळमना ला हलवल्यानी बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याचे परिवार चवाट्यावर आल्याचे दिसत आहे.
कन्हान रेल्वे सायडिंग येथे हे कामगार जवळपास वर्षं२००२ पासून ४०० कामगार काम करत असून त्यांच्या सोबत जवळपासचे दुकानदार त्याच्या वॉर निर्भर आहे. त्यांच्या मते आता आतापर्यंत इथे असले भांडण कधी झाले नाही..पण ट्रान्सपोर्टर व गाडी मालकी यांच्यातील वाद वडल्यानी आता रॅक कालमनाला लागत आहे.
ट्रान्सपोर्टर राजकुमार गुलाटी व कन्हान येथील १० ते १५ गाडी मालक हे युनिअन बाजी करत आहेत. व यांच्या वादांमुळे इथॅले काम कळमना सायडिंग हलवल्या ठिकाणी, जिथे कन्हान ची रॅक लागत आहे तिथे फक्त ५० ते ६० कामगार कामावर येतात व ते सुद्धा कान्हाच्या स्थानिक कामगारांनी प्रत्यक्षात जाऊन बघितल्याचे सांगितले जात आहे.
सुभाष अतकरी (नागपूर) येथील असलेले मुकळदम यांचे काम तिथे नसून त्यांच्या काम म्युझिअम आणि मीठानिम येथील FCI येथील काम आहे. त्यांच्या मते ते आपले कामगार घेऊन कळमना सायडिंगला काम करीत आहे. इथल्या माथाडी कामगारांनी माथाडी बोर्डच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली व ते अधिकारी त्या कामगारांचे नाव लिहून गेले. पण अद्यापही काहीच कार्यवाही झली नाही… कन्हान च्या माथाडी कामगारांचे सतर्कतेचा इशारा दिला आहे. जर आमच्या समस्या दूर झाल्या नाही तर आम्ही आंदोलन करु असा ईशारा दिला आहे.
कन्हान रेल्वे सायडिंग च्या माथाडी कामगारांचे दयनीय हालत

0 टिप्पण्या