मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार गीता जैन जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघा मधून स्वतंत्र निवडणूक जिकणारे आमदार गीता जैन ह्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता…पण त्यांच्य्यात काही भाजप पक्षाचे काही दिग्गज नेत्याशी आंतरिक मतभेत असल्यानी, आमदार गीता जैन यांनी भाजप ला दिलेला पाठिंबा सोडून त्या आता शिवसेना पक्षात… म्हणजे महाविकास आघाडीवीच्या सरकार मध्ये प्रवेश घेतला. आपणास माहीत असेल आता काही तासा अगोदर भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे ह्यांनी देखील राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेतला, असुना २४ तासाच्या आता भाजपला हा दुसरा झटका बसला आहे. आपणास माहित असेल मिरा-भाईंदर आमदार गीता जैन ह्या महापालिकेच्या महापौर होत्या व त्यांनी भाजपच्या विरोधात बंड पुकारला होता. व त्या अपक्ष निवडून आल्या होत्या. असे म्हणतात कि आमदार गीता जैन यांना जिंकण्यासाठी शिवसेना पक्षांनी आंतरिक रित्याना मदत देखील केली होती..?
0 टिप्पण्या