Advertisement

सार्वजनिक वाचनालयात निबंध व शुद्धलेखन स्पर्धा


सार्वजनिक वाचनालयात निबंध व शुद्धलेखन स्पर्धा


कन्हान : - कन्हान शहरातील हनुमान नगर येथील सार्वजनिक वाचनालयात महात्मा गांधींची १५७ वी आणि लालबहादूर शास्त्री यांची १२१ वी जयंती साजरी करण्यात आली. 


वासुदेवराव चिकटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला संजयराव आगलावे, गंगाधरराव अवचट, रमेशजी चित्रीव यांची प्रमुख उपस्थिती होती. महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण केल्यानंतर दिनकरराव मस्के यांनी गांधीजींच्या सत्य-अहिंसेच्या विचारांसह शास्त्रीजींच्या ‘जय जवान, जय किसान’ मंत्राविषयी मार्गदर्शन केले.


यानिमित्त वाचनालयातील सभासद व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा व शुद्धलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन दिनकरराव मस्के यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल श्याम बारई यांनी केले.


कार्यक्रमानंतर उपस्थितांना अल्पोपहार, मिठाई व फळांचे वाटप करण्यात आले.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या