टेकाडीतील केडीके कॉन्व्हेंटमध्ये गांधी जयंती उत्साहात साजरी
महात्मा गांधींच्या विचारांना अभिवादन; विद्यार्थ्यांना सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेचा संदेश
टेकाडी : - टेकाडी परिसरातील केडीके कॉन्व्हेंट शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि समाजसेवेच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. शाळेचे संचालक अविनाश कांबळे यांच्या हस्ते गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. उपस्थित शिक्षक व नागरिकांनीही गांधीजींना अभिवादन केले.
यावेळी महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याची आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. सत्य, अहिंसा, स्वच्छता, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन करण्यात आले. गांधीजींचे विचार आजच्या पिढीसाठीही मार्गदर्शक असून, विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात स्वच्छता व शिस्तीला महत्त्व द्यावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाला शिक्षिका निशा देशमुख, मनिषा कांबळे, सुरेखा हिंगे, अर्पना गजभिए, नमिता ढोबळे यांच्यासह शाळेतील कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या