कन्हान - पिपरी नगर परिषद द्वारे महापुरुषांना अभिवादन
कन्हान : - नगर परिषद कन्हान-पिपरी कार्यालय आणि महात्मा गांधी चौक येथे गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम पार पडला. मान्यवरांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे, उपाध्यक्ष रिंकेश चवरे, नगरसेवक मनोज कुरडकर, केतन भिवगडे, प्रशांत पाटील, हरीश तिडके, शिवशंकर वाकुडकर, नगरसेविका रेखाताई टोहणे, सुषमा चोपकर, प्रियंका बैस, पूनम राठी, आशा महातो, नीती तेलोते तसेच नगर परिषद कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या