Advertisement

आगाऊ नियोजन, प्रभावी समन्वय अन् कडक अंमलबजावणी; एसपी हर्ष पोद्दार यांच्या नेतृत्वात नागपूर ग्रामीण पोलिसांची गणेश विसर्जनात उल्लेखनीय कामगिरी


आगाऊ नियोजन, प्रभावी समन्वय अन् कडक अंमलबजावणी; एसपी हर्ष पोद्दार यांच्या नेतृत्वात नागपूर ग्रामीण पोलिसांची गणेश विसर्जनात उल्लेखनीय कामगिरी

मंडळांशी संवादाचा परिणाम; डीजे-लेझरमुक्त वातावरणात ५५६ सार्वजनिक गणेशमूर्तींचे शांततेत विसर्जन

नागपूर : - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूर ग्रामीण पोलिसांनी केलेले आगाऊ नियोजन, गणेश मंडळांशी सातत्याने साधलेला संवाद आणि नियमांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे यंदाचा गणेश विसर्जन सोहळा शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या नियोजनबद्ध पोलिसिंगचे हे महत्त्वपूर्ण उदाहरण ठरले.

गणेशोत्सवापूर्वीच नागपूर ग्रामीण पोलिसांनी गणेश मंडळांचे पदाधिकारी, आयोजक तसेच डीजे ऑपरेटर यांच्यासोबत बैठका घेऊन ध्वनिप्रदूषणाचे नियम, न्यायालयाचे निर्देश आणि डीजे व लेझर लाईटवरील निर्बंध याबाबत स्पष्ट सूचना दिल्या.

जिल्ह्यात एकूण ५४ बैठका घेण्यात आल्या. यामध्ये सहा बैठका उपविभागीय स्तरावर, तर इतर बैठका पोलीस ठाणे स्तरावर घेण्यात आल्या. या औमाध्यमातून पोलिसांनी आयोजकांशी थेट संवाद साधत विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक नियोजन केले.

पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांनी अधिकाऱ्यांना आगाऊ नियोजन, मंडळांशी समन्वय आणि संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. विसर्जन मार्ग, गर्दीची ठिकाणे आणि संवेदनशील परिसरात पोलिसांनी आवश्यक बंदोबस्त ठेवला.


पोलिसांच्या आवाहनाला मंडळांचा सकारात्मक प्रतिसाद

गणेश मंडळांनी पोलिसांच्या सूचनांना सकारात्मक प्रतिसाद देत डीजे आणि लेझर लाईटचा वापर टाळला. त्यामुळे जिल्ह्यातील ५५६ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले.

आगाऊ नियोजन, प्रभावी संवाद आणि मंडळांचे सहकार्य यामुळे गणेश विसर्जनाचा उत्सव सुरळीत पार पडला, अशी भूमिका पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी व्यक्त केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर ग्रामीण पोलिसांनी उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या समन्वयपूर्ण नियोजनाचे सकारात्मक परिणाम यावेळी दिसून आले.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या