पाच बकऱ्या चोरीच्या गुन्ह्यात एक आरोपी अटकेत
चारचाकी वाहनासह १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त;
स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पथकाची कारवाई
कन्हान : - कन्हान शहरातील सुपर टाऊन, प्रभाग क्रमांक २ येथील वयोवृद्ध हौसालला पुंड यांच्या घरालगत असलेल्या बकऱ्यांच्या कोठ्यातून पाच बकऱ्या चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणच्या पथकाने छडा लावला आहे. या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन आणि बकऱ्या विकून मिळालेले रोख पैसे असा एकूण १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, (दि.१५) सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास हौसालला पुंड यांच्या घरालगत असलेल्या बकऱ्यांच्या कोठ्यातून अज्ञात चोरट्यांनी पाच बकऱ्या चोरून नेल्या. चोरी झालेल्या बकऱ्यांची अंदाजे किंमत १ लाख रुपये होती. याप्रकरणी पुंड यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ६५८/२०२६, कलम ३०३(२) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू असतांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने साथीदाराच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याच्या ताब्यातून बकऱ्या विकून मिळालेले रोख २० हजार रुपये, गुन्ह्यात वापरलेली हुंडाई आय-२० कार क्रमांक एमएच ०४ डीवाय १३३५) किंमत अंदाजे १ लाख ५० हजार रुपये असा एकूण १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संजोग लीलाधर होले (वय २३), रा. टिमकी, नागपूर, हल्ली मुक्काम चणकापूर, खापरखेडा असे आहे. या प्रकरणातील सुरेंद्र उर्फ कल्लू लीलाधर होले, रा. टिमकी, नागपूर हा अन्य संशयित आरोपी असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. जप्त मुद्देमाल व संबंधित कागदपत्रांसह आरोपीला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी कन्हान पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय चनोर, पोहवा संजय बांते, पोहवा प्रमोद भोयर, पोहवा शैलेश यादव,
पोहवा सतीश राठोड, पोना संजय बरोदिया, पोशी सम्राट वनपर्ती, पोशी अभिषेक देशमुख, चापोशी आशुतोष लांजेवार सह आदि पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या