वीज तारेला करंट लागून जखमी झालेल्या चिलीचा यशस्वी रेस्क्यू
वाइल्ड ॲनिमल अँड नेचर बहुउद्देशीय संस्थेच्या सर्पमित्रांनी दाखवली तत्परता; वनविभागाच्या TTCकडे केले सुपूर्द
कन्हान : - कन्हान शहरातील एम.जी. नगर परिसरात वीजेच्या तारेला करंट लागून जखमी झालेल्या मोठ्या आकाराच्या चील (Black Kite) पक्ष्याला वाइल्ड ॲनिमल अँड नेचर बहुउद्देशीय संस्था, कन्हानच्या सदस्यांनी तत्परतेने रेस्क्यू करून जीवदान दिले.
सोमवार (दि.२४) ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास एम.जी. नगर येथे मयूर माथुरे यांच्या घरासमोर वीजेच्या तारेला करंट लागल्याने एक चील पक्षी जखमी अवस्थेत आढळून आला. याची माहिती तात्काळ मयूर माथुरे यांनी वाइल्ड ॲनिमल अँड नेचर बहुउद्देशीय संस्था, कन्हानचे सदस्य मंगेश मानकर व राजकुमार बावने यांना दिली.
माहिती मिळताच संस्थेचे सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आवश्यक खबरदारी घेत जखमी चिलीचा सुरक्षित व यशस्वीपणे रेस्क्यू केला. त्यानंतर उपचारासाठी सदर पक्षी वनविभागाच्या TTCकडे सुपूर्द करण्यात आला.
जखमी चिलीवर आवश्यक उपचार करून त्याला पूर्णपणे बरे झाल्यानंतर पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात येणार आहे.
वन्यजीवांच्या संरक्षणासाठी वाइल्ड ॲनिमल अँड नेचर बहुउद्देशीय संस्था, कन्हानचे सदस्य २४ तास, ७ दिवस सेवा देण्यासाठी तत्पर असून, संकटात सापडलेल्या वन्यजीवांना मदत करण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून सातत्याने केले जात आहे.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या