Advertisement

कन्हानमध्ये १७ वर्षांची ‘भुजैलिया’ पर्वाची परंपरा कायम


कन्हानमध्ये १७ वर्षांची ‘भुजैलिया’ पर्वाची परंपरा कायम


रक्षाबंधनानिमित्त किराड-किरात समाजाचा उत्साहात सोहळा ; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून शिक्षणाला प्रोत्साहन


कन्हान : - रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त कन्हान किराड-किरात समाजाच्या वतीने गेल्या १७ वर्षांपासून सातत्याने साजरा करण्यात येणारा पारंपरिक ‘भुजैलिया पर्व’ यंदाही शनिवारी (२९ ऑगस्ट) मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. 


धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक एकोपा, सांस्कृतिक परंपरा आणि शैक्षणिक प्रोत्साहनाचा संदेश देणाऱ्या या सोहळ्याला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या निमित्ताने तुकाराम मंदिरापासून डोनेकर सभागृहापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीनंतर डोनेकर सभागृहात भगवान शिवाला भुजैलिया अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत समाजबांधवांनी एकमेकांना भुजैलिया देत आशीर्वाद घेतला. या माध्यमातून परस्पर स्नेह, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्य अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष राजू शेंद्रे, माजी नागपूर जिल्हा उपाध्यक्ष शरद डोनेकर, नगरसेवक विनोद किरपान, समाजाध्यक्ष नारद दारोडे तसेच ज्येष्ठ समाज नागरिक रामराव लुहुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.


भुजैलिया पर्वाच्या निमित्ताने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या अंश सुधाकर मोहने, भूमिका दामोदर दारोडे आणि आयुष अरविंद बादोले या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नव्या पिढीने शिक्षणाच्या क्षेत्रात पुढे जावे, यासाठी समाजाने दिलेला हा सकारात्मक संदेश ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन लुहुरे यांनी केले, तर आभार नत्थु नन्होरे यांनी मानले.


 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष योगदान देणारे ज्ञानेश्वर नारद दारोडे आणि संजय मोहने यांचा नगराध्यक्ष राजू शेंद्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी दीक्षा लुहुरे, रजनी लुहुरे आणि नितेश लुहुरे यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी राधेश्याम हारोडे, दीपक हारोडे, नरेश गडे, मनोहर बादुले, राजेंद्र काठोके, आकांक्षा दारोडे, चंपाबाई दारोडे, किशोरी काठोके, पंचम गडे, माधव काठोके, मारोतराव खंडाईत, सुधीर गडे, अनिल लुहुरे, रमेश गडे, अंकुश बादुले, युवराज बरबटे, अशोक डडुरे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.


१७ वर्षांची अखंड परंपरा जपत धार्मिक आस्था, सामाजिक एकजूट, सांस्कृतिक वारसा आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा भुजैलिया पर्व कन्हानच्या सांस्कृतिक जीवनातील एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी उपक्रम ठरला.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या