सैनिक फेडरेशनचा विभागीय महामेळावा उत्साहात संपन्न; सैनिकांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार - ब्रिगेडियर सुधीर सावंत
मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा: सैनिकांच्या विविध अडीअडचणींबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाईल, अशी महत्त्वाची घोषणा ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी यावेळी केली.
डिसेंबरमध्ये मुंबईत राज्यस्तरीय महामेळावा: आगामी डिसेंबर महिन्यात मुंबई येथे एक भव्य महाराष्ट्र स्तरीय महामेळावा आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले असून, या अनुषंगाने जिल्हा व मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना सुधीर सावंत आणि जनरल सेक्रेटरी निंबाळकर यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या.
उपस्थिती व आयोजन:
या मेळाव्यासाठी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमधून आजी-माजी सैनिक, सैनिक कुटुंबीय आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता: जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर डुमणे यांनी प्रास्ताविक केले, तर लक्ष्मण देवदे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.


0 टिप्पण्या