Advertisement

संजीवनी नगर परिसरात घरफोडी ; ३५ हजारांचा मुद्देमाल लंपास


संजीवनी नगर परिसरात घरफोडी ; ३५ हजारांचा मुद्देमाल लंपास


कन्हान : कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत संजीवनी नगर परिसरात बंद घराचे लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत चांदीचे दागिने व रोकड असा एकूण अंदाजे ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


प्राप्त माहितीनुसार, संजीवनी नगर, कांद्री येथील खेमराज रामेश्वर कुर्वे (वय ५४) हे आपल्या कुटुंबीयांसह गुरुवार (दि.२७) ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास पुणे येथे मुलगा करण कुर्वे याच्याकडे जाण्याकरिता निघाले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. दरम्यान शुक्रवार (दि. २८) ऑगस्ट रोजी सकाळी ८.०४ वाजता तन्नु कुर्वे यांनी त्यांचे नातेवाईक सुनिल मधुकर ढोमणे यांना फोन करून संजीवनी नगर येथील घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याची माहिती दिली. माहिती मिळताच सुनिल ढोमणे हे कन्हान पोलीस ठाण्यात पोहोचले व पोलिसांच्या मदतीने संबंधित घराची पाहणी केली.


पाहणीदरम्यान घराच्या लोखंडी दरवाजाचे कुलूप तुटलेले तसेच घराचा दरवाजाही तोडलेल्या अवस्थेत आढळून आला. तक्रारदार सुनील ढोमणे यांनी त्यांचे भाऊजी खेमराज कुर्वे यांना फोन करुन घरात ठेवलेले सोने, चांदिचे दागिने आणि रोख रक्कमची माहिती घेतली. घरातील कपाटाची पाहणी केली असता चांदीच्या तीन पैरपट्ट्या अंदाजे १० हजार रुपये, मंदिराच्या वर्गणीची २० हजार रुपये रोकड, तसेच मातीचा गुल्लक फोडून त्यातील अंदाजे ५ हजार रुपये रोकड, असा एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे समोर आले.


या प्रकरणी कन्हान पोलीसांनी सुनिल मधुकर ढोमणे यांचा तक्रारी वरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या