इटगाव येथे समता सैनिक दलाची नवीन शाखा उत्साहात गठित
पारशिवनी (दि. १४ सप्टेंबर २०२६):
पारशिवनी तालुक्यातील इटगाव येथील शांती बौद्ध विहार येथे १३ सप्टेंबर २०२६ रोजी समता सैनिक दलाच्या नवीन शाखेची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात व पाहुण्यांची उपस्थिती:
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या नवनिर्मित शाखेचे उद्घाटन सोनिका वाघमारे यांच्या हस्ते झाले, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एस.एस.डी.डी. संगीता वाकपांजरे यांनी भूषविले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष सुजाता डबरासे, मुख्य ट्रेनिंग कमांडर सैनिक ध्वजपाल फुले, शीतलताई तिरपुडे, प्रफुल मेश्राम, किशोर गजभिये, पुनादास गजभिये, तुळशीदास लांजेवार, विशाखा गजभिये आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित कार्यकारिणी बोर्डाचे उद्घाटन करण्यात आले आणि सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
नवनिर्वाचित कार्यकारिणी:
या वेळी जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत खालील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे:
- अध्यक्ष: सैनिक शोभा बागडे
- उपाध्यक्ष: विकास रंगारी
- सचिव: संगीता गजभिये
- सहसचिव: प्रफुल मेश्राम
- कोषाध्यक्ष: किशोर गजभिये
- सह सैनिक / सदस्य: ज्ञानेश्वर गजभिये, बुद्धभीम डोंगरे, निशांत ढोके, धम्मकुल गजभिये, अविनाश चिंचखेडे, गौरव गजभिये, सुमित डोंगरे, सागर गणेर, दीपांशू बोरकर, शिलधन गजभिये, क्रिस वाळके, केवल ढोके, अदवित गजभिये, सतीश चव्हाण, मीना मेश्राम, सुरेखा बागडे, वेणु ढोके, लता रंगारी, प्रतिभा बोरकर, रमा गायकवाड, आम्रपाली मेश्राम, कांता वाहणे, कांता बर्वे, इंदिरा बेलेकर, बेबीताई बागडे, कला गजभिये, जयश्री बागडे, तारा बेलेकर, कल्पना मेश्राम, पौर्णिमा रंगारी, लक्ष्मी मेश्राम, जयश्री गणेर, रविना रंगारी, शीतल गजभिये, रंजिता रंगारी, अश्विनी डोंगरे, रूपाली डोंगरे, सरिता कदम, इंदू वाहणे, शोभा गजभिये, संगीता बर्वे, कांता गजभिये, निरंजना रंगारी, धीरन वाहणे, शांता गजभिये, रमा मानवटकर, निकिता गणेर आदींचा समावेश आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांसाठी भोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर वृत्त पुनादास गजभिये, पारशिवनी (नागपूर) यांच्याकडून प्राप्त झाले आहे.


0 टिप्पण्या