Advertisement

रायनगरमध्ये माजी नगरसेविकेच्या घरी पाच फुटांचा विषारी कोबरा


रायनगरमध्ये माजी नगरसेविकेच्या घरी पाच फुटांचा विषारी कोबरा


 सर्पमित्रांनी केले सुरक्षित रेस्क्यू ; वन्यजीव संस्थेच्या सदस्यांनी पकडून जंगलात सोडले


कन्हान : - कन्हान शहरातील रायनगर परिसरात माजी नगरसेविका सौ. राखी संदिप परते यांच्या घरी तब्बल पाच फुटांचा विषारी कोबरा नाग आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घरात नाग आढळल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती तात्काळ वाइल्ड ॲनिमल अँड नेचर बहुउद्देशीय संस्था, कन्हान यांच्या सदस्यांना देण्यात आली. माहिती मिळताच संस्थेचे सदस्य राजकुमार बावने आणि राहुल शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक व सुरक्षित पद्धतीने पाच फुटांच्या कोबरा नागाला पकडले. सर्पमित्रांनी नागाला कोणतीही इजा न करता त्याचा सुरक्षित रेस्क्यू केला. त्यानंतर त्याला मानवी वस्तीपासून दूर असलेल्या सुरक्षित जंगल परिसरात सोडण्यात आले. त्यामुळे संभाव्य धोका टळला असून परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.



पावसाळ्याच्या दिवसांत साप, अजगर तसेच इतर वन्यजीव सुरक्षित आसऱ्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येण्याची शक्यता असते. त्यामुळे घराच्या परिसरात विषारी साप किंवा इतर वन्यजीव आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून त्यांना पकडण्याचा अथवा मारण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी सुरक्षित अंतर ठेवून तात्काळ सर्पमित्र किंवा संबंधित वन्यजीव बचाव पथकाला माहिती द्यावी. वाइल्ड ॲनिमल अँड नेचर बहुउद्देशीय संस्था, कन्हान यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, विषारी कोबरा, अजगर, साप किंवा इतर धोकादायक वन्यजीव आढळल्यास तात्काळ संपर्क साधावा असे आव्हाहन सदस्य राजकुमार बावने 7798627324 , 8208351683 यांनी केले .

वन्यजीवांचे संरक्षण करतानाच नागरिकांची सुरक्षितता राखणे, हा संस्थेचा उद्देश असून नागरिकांनी वन्यजीव दिसल्यास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या