संत वसंत बाबा बेडीवाले जन्म महोत्सव सोहळा पारशिवनी येथील शिवटेकडीवर उत्साहात संपन्न
पारशिवनी: येथील प्रसिद्ध शिवटेकडीवरील श्री संत वसंत बाबा बेडीवाले सार्वजनिक देवस्थान येथे संत वसंत बाबा बेडीवाले यांचा जन्म महोत्सव सोहळा मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात पार पडला.
४ सप्टेंबर रोजी आयोजित या पावन पर्वावर दीप प्रज्वलन सोहळा संपन्न झाला. या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. रश्मीताई श्यामजी बर्वे, पारशिवनी नगरपंचायतीच्या सौ. सुनीताताई प्रकाशजी डोमके, नगरपंचायतचे दीपकजी शिवरकर, तसेच माजी सरपंच प्रकाशजी डोमके आणि स्थानिक नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.
या जन्म महोत्सवात बाबांचे सर्व कुटुंबीय, भाविक आणि परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महोत्सवाचा लाभ घेतला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी धनराज मनगटे परिवार, भारत सावरकर परिवार, नरेंद्र दिघे परिवार, माधुरी राऊत परिवार, रेखा दिघे परिवार, ऋषी सावरकर परिवार आणि प्रकाश मोरे या निष्ठावंत सेवकांनी विशेष मेहनत घेतली, ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.
— पारशिवनीहून प्रतिनिधी गौतम सावरकर यांच्यासह विशेष वृत्त.


0 टिप्पण्या