भरधाव कार डिव्हायडर वर आदळली ; चालकासह कुटुंबातील सदस्य जखमी
चक्रधर पेट्रोल पंपासमोरील घटना; निष्काळजी वाहनचालका विरुद्ध पोलिसांत तक्रार
Speeding car hits divider; Driver and family members injured
कन्हान : - कन्हान शहरातील चक्रधर पेट्रोल पंपासमोर नागपूर - जबलपूर मार्गावर भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालविण्यात आलेली कार डिव्हायडरला धडकल्याची घटना शुक्रवार (दि.१८) सप्टेंबर रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात कारमधील चालकासह कुटुंबातील काही सदस्य व लहान मुले जखमी झाल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, अमोल धर्मराज भुसारी (वय ३५) रा. सुपर टाऊन, कन्हान) हे टाटा एस वाहन क्र.एमएच ४० सीटी ३५९३ घेऊन पेट्रोल भरण्यासाठी चक्रधर पेट्रोल पंपाकडे जात होते. पेट्रोल पंपासमोर वाहन उभे असताना त्यांना अचानक मोठा आवाज ऐकू आला. त्यांनी वाहनातून उतरून घटनास्थळी पाहिले असता एमपी २० झेडजी ७४३७ क्रमांकाची कार डिव्हायडरला धडकलेली दिसली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, कार चालकाने वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविल्याने कारचा डिव्हायडरला जोरदार धक्का बसला. कारमध्ये चालकासह कुटुंबातील सदस्य व लहान मुले प्रवास करीत होती. अपघातात त्यांना दुखापत झाली.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिकेला फोन करून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले. घटनेची माहिती कन्हान पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चालकाने आपले नाव परसराम ठाकूर,रा. छपारा, सिवनी (मध्य प्रदेश) असे सांगितल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. या प्रकरणी अमोल भुसारी यांनी कन्हान पोलीस ठाण्यात तोंडी रिपोर्ट दिली असून, एमपी २० झेडजी ७४३७ वाहन चालकाविरुद्ध भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडविल्याबाबत तक्रार नोंदविण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहेत.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या