Advertisement

कन्हानमध्ये विकास प्राथमिक शाळेत ‘ग्रीन डे’ उत्साहात साजरा


कन्हानमध्ये विकास प्राथमिक शाळेत ‘ग्रीन डे’ उत्साहात साजरा


विद्यार्थ्यांच्या नाटिका व पर्यावरणपूरक वेशभूषेतून ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश


कन्हान : - विकास प्राथमिक शाळा व विकास कॉन्व्हेंट, कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने दि. बुधवार (५ ऑगस्ट) २०२६ रोजी ‘ग्रीन डे’ कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचा संदेश देणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.


कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या संदेशावर आधारित आकर्षक नाटिका सादर केली. तसेच पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या विविध वेशभूषा धारण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. निसर्गापासून मानवाला मिळणाऱ्या विविध गोष्टी, झाडांचे महत्त्व तसेच वृक्षतोडीमुळे होणारे पर्यावरणीय नुकसान याबाबत विद्यार्थ्यांना नाटिकेच्या माध्यमातून प्रभावीपणे मार्गदर्शन करण्यात आले. ग्रीन डेचे महत्त्व विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने समजावे, या उद्देशाने पालकांनीही विशेष सहभाग नोंदवत विविध हिरव्या रंगाच्या खाद्यपदार्थांची तयारी करून आणली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होण्यासोबतच कार्यक्रमाला उत्साहपूर्ण स्वरूप प्राप्त झाले.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खंडाईत, ज्येष्ठ शिक्षक शशिकांत बोंद्रे, रविकांत गेडाम, शरद डोकरीमारे, देवेंद्र सेंगर यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी विशेष परिश्रम घेतले. केजी-१ व केजी-२च्या शिक्षिका सौ. अभिलाषा कावडे व सौ. ज्योती घोडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ‘ग्रीन डे’ कार्यक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचला.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या