Advertisement

कन्हानमध्ये भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारून परिसराचे सौंदर्यीकरण करा


कन्हानमध्ये भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारून परिसराचे सौंदर्यीकरण करा


बिरसा ब्रिगेडची नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व सभापतींकडे निवेदनाद्वारे मागणी


कन्हान : - आदिवासी समाजाचे महान स्वातंत्र्यसैनिक व जननायक भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा कन्हान-पिपरी नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेवर उभारून परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी बिरसा ब्रिगेड व आदिवासी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे, मुख्याधिकारी दीपक घोडकी तसेच महिला व बालकल्याण सभापती योगिता भलावी यांना निवेदन देण्यात आले.


कन्हान शहरातील नागरिकांना भगवान बिरसा मुंडा यांच्या महान कार्याची माहिती व्हावी, तसेच आदिवासी समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक योगदानाचा सन्मान व्हावा आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा भावी पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने ही मागणी करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या मालकीच्या योग्य जागेवर, प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ किंवा नगरपरिषद परिसरात भगवान बिरसा मुंडा यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा. तसेच पुतळ्याच्या परिसरात माहिती फलक उभारून आवश्यक सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. या कामासाठी नगरपरिषद प्रशासनाने सकारात्मक विचार करून आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही करावी. तसेच शासनाच्या लागू नियमांनुसार योग्य निधीतून या कामास मंजुरी मिळण्यासाठी प्रस्ताव संबंधित सक्षम प्राधिकरणाकडे पाठवावा, अशी मागणीही बिरसा ब्रिगेडने केली आहे.


निवेदन देताना बिरसा ब्रिगेडचे सुखलाल मडावी यांच्या प्रमुख उपस्थितीत बंडुजी इरपाते, रामलाल पटटा, गगन सिरसाम, रोशन मरस्कोल्हे, मानसिंग टेकाम, गणपत मरस्कोल्हे, सुरेश सिडाम, शालु सूर्यवंशी, सुनीता मेहता, केसर सिरसाम, गीता इरपाते, तसम इरपाते, सुशिला इरपाते, संगिता डोमळे, सरोज मरस्कोल्हे, मानसी राऊत, गौरी नागवंशी, मीरा इनवाते यांच्यासह आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या