कन्हान येथे राणी अवंतीबाई लोधी यांची १९५ वी जयंती उत्साहात साजरी
भव्य रॅलीसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; राणी अवंतीबाईंच्या शौर्यगाथेने कन्हान शहर दुमदुमले
कन्हान : - मध्य भारतातील पहिल्या स्वातंत्र्यलढ्याच्या प्रणेत्या आणि रामगडच्या शूरवीर राणी अवंतीबाई लोधी यांची १९५ वी जयंती कन्हान शहरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. राणी अवंतीबाई लोधी क्षत्रिय समाज, पिपरी, कन्हान, सिहोरा व कांद्री यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
पिपरी येथील दुर्गामाता चौकात राणी अवंतीबाई लोधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राणी अवंतीबाई लोधी यांच्या शौर्यपूर्ण जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या त्याग, धैर्य आणि देशभक्तीची प्रेरणा नव्या पिढीने घ्यावी, असे आवाहन केले.
यानंतर कन्हान - पिपरी शहरात भव्य रॅली काढण्यात आली. रैली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जुने पोलीस स्टेशन, गांधी चौक मार्गे होत महामार्गावरून ही रॅली भारत माता चौक, कांद्री शहरातून फिरत तारसा रोड चौकातील हार्दिक गेस्ट हाऊस येथे पोहोचली.
रॅलीचे प्रमुख आकर्षण म्हणजे राणी अवंतीबाई लोधी यांच्या वेशभूषेत घोड्यावर स्वार झालेल्या मुली. तसेच डीजेवर सादर करण्यात आलेली राणी अवंतीबाईंची जीवनकथा, अल्हा गायन आणि शौर्यगाथांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. संपूर्ण परिसरात देशभक्ती आणि शौर्याचा उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाला होता.
यानंतर १०वी आणि १२वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती राजकुमार कुसुंबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला लोधी कल्याण महासभेचे अध्यक्ष लालसिंह ठाकूर, मुख्याध्यापक मोहन गिरिया, मोरेश्वर कुमोरिया, समाजसेवक मुन्नाजी वर्मा, माजी सभापती पारशिवनी मंगलाबाई निंबोने, माजी सभापती रामटेक नरेंद्र बंधाटे, माहुलीचे सरपंच प्रेमचंद कुसुंबे, घाटरोहणा सरपंच किशोर बिहुणे, डॉ. सेवकराम बिलोने, मुलचंद शिंदेकर, गुरुदेव सेवा मंडळाचे चंद्रभान बिहुणे, महादेव लिल्लारे, राणी अवंतीबाई लोधी समाजाचे अध्यक्ष श्रावण वर्तेकर, उपाध्यक्ष केशरीचंद खंगारे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून विवेक क्षत्रिय यांनी लोधी समाजाचा इतिहास, समाजाची प्रगती तसेच संस्थेच्या विविध सामाजिक कार्यांचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनम वतेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रेमलता छनिकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मोहित वतेकर, जयकांत शांडीले, विधीलाल डहारे, अमित आकोने, भगवंत निंबोने, चंद्रहास पु-हे, ओमप्रकाश निंबोने, संतोष ठकरेले, शैलेश आकोने, सागर गेरवाल, नंदकिशोर लोधी, प्रजापती खंगारे, जितेंद्र वर्मा, सचिन खंगारे, विठ्ठल क्षत्रिय, दिनेश लोधी, धर्मराज ठकरेले, भाऊराव लिल्लारे, राजेश क्षत्रिय, महेश लोधी, रोहित वतेकर, निहार लोधी, प्रकाश नागपुरे, सागर कोठेकर, रंजित शिंदेकर, किरण ठाकूर, नरेंद्र सोलंकी, दिपाली खंगारे, चंद्रकला मेहुणे, नंदिनी बघेले, कल्पना खंगारे, अर्चना लोधी यांच्यासह पिपरी, कन्हान, सिहोरा, कांद्री तसेच परिसरातील गावांतील समाजबांधवांनी सहकार्य केले.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या