कन्हानमध्ये ज्येष्ठ नागरिक दिवस उत्साहात साजरा; विविध क्षेत्रातील ज्येष्ठांचा सन्मान
कन्हान , कांद्री शहर विकास मंचच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन
कन्हान : - कन्हान , कांद्री शहर विकास मंचच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांसह शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंचचे मार्गदर्शक भरत सावळे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्याध्यापिका सौ. विशाखा ठमके, लीलाबाई देशमुख, ज्येष्ठ पत्रकार आणि माजी मुख्याध्यापक एन. एस. मालवीय, ज्येष्ठ समाजसेवक शांतराम जळते, प्रकाश नाईक, श्रीराम नांदुरकर, माजी सैनिक जयवंत गटपाडे, रविकुमार रंग, अरविंद अंबासकर, मोहनसिंग यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मंचच्या पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना दुपट्टा, शाल, पेन व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.
कार्यक्रमात मान्यवरांनी ज्येष्ठ नागरिक दिनाचे महत्त्व विशद करत ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा समाजाच्या विकासासाठी उपयोग होणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच सर्व ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी प्रास्ताविकातून मंचचे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर यांनी कन्हान शहराच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा उपस्थित करत शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांबाबत चिंता व्यक्त केली. शहरातील विविध ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष वेधत नागरिकांनी एकत्रितपणे पुढे येऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे आंदोलन उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंचचे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर उके यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंचचे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर, मार्गदर्शक भरत सावळे, नारायण गजभिए, नयन गायकवाड, अर्जुन पात्रे, ज्ञानेश्वर उके, सूर्यभान चकोले, निखिल मेश्राम, अभिषेक साखरे, शुभम बावनकर, मयूर बावने, प्रमोद गिऱ्हे, अर्चना तांडेकर, सुषमा मस्के, मीना गिऱ्हे, मेघा कोल्हे, रंजना किरपाने, सुनीता मानकर, राहुल वानखेडे, सुरज वरखडे, आयुष संतापे यांच्यासह मंचच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या