Advertisement

कन्हान येथे गुरुंचे पूजन व आशीर्वाद घेऊन गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी


कन्हान येथे गुरुंचे पूजन व आशीर्वाद घेऊन गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी


२१ वर्षांची अखंड परंपरा ; विकास हायस्कूल कन्हानच्या माजी विद्यार्थी परिवाराकडून गुरुजनांचा भावपूर्ण सत्कार


कन्हान : - विकास हायस्कूल, कन्हान (बॅच १९८०-८१) च्या माजी विद्यार्थी परिवाराच्या वतीने गेल्या २१ वर्षांपासून जपली जात असलेली गुरुपौर्णिमा साजरी करण्याची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडली. डोणेकर सभागृह, मेन रोड, कन्हान येथे आयोजित कार्यक्रमात गुरुजनांचे पूजन करून त्यांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेण्यात आला.


कार्यक्रमाची सुरुवात विधिवत पूजा, दीपप्रज्वलन आणि गुरु वंदनेने झाली. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी देशमुख सर, धावडे सर, कोहळे सर, मालवीय सर, पोतदार सर, खर्चे सर, बारई मॅडम, खुर्गे मॅडम, कोहळे मॅडम, फरसोले मॅडम, फुलबांधे मॅडम, चिंचुलकर मॅडम, मानधाते मॅडम, पटले मॅडम व भोयर मॅडम यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार केला. तसेच गुरुदक्षिणा म्हणून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरु-शिष्य परंपरेचे प्रतीक असलेली आकर्षक मूर्ती भेट देण्यात आली.


यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे, प्रेम रोडेकर व नरेश बर्वे यांनी शालेय जीवनात गुरुजनांनी दिलेले शिक्षण, संस्कार आणि मार्गदर्शनामुळेच जीवनात यशस्वी वाटचाल करता आल्याची भावना व्यक्त केली. बारई मॅडम व पोतदार सर यांनी प्रकाशभाऊ जाधव यांच्या पुढाकाराने २००५ पासून सातत्याने सुरू असलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत गुरु-शिष्य नात्याचे जतन करणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


कार्यक्रमाला कन्हान पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे, शाळा संचालक भूषणराव निंबाळकर, संस्था सचिव भरत साळवे, मुख्याध्यापक गिरजाशंकर यादव, मुख्याध्यापक राजेश खंडाईत, माजी मुख्याध्यापक ज्ञानप्रकाश यादव, शांताराम जळते, पुरुषोत्तम मस्के, माजी सैनिक रवी रंग, प्रविण सचदेवे, माजी पोलीस गणेश खांडेकर, चंद्रशेखर कळमदार, पत्रकार मोतीराम रहाटे, कमलसिंह यादव, मोहन रंगारी, किशोर वासाडे, मोहम्मद शफी, ऋषभ बावनकर, दिनेश नानवटकर, नथुजी चरडे, कोठीराम चकोले, नेवालाल पात्रे, देवा चतूर, नगरसेविका रेखा टोहणे, माजी नगरसेविका राखी परते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


माजी विद्यार्थी परिवाराचे प्रमुख प्रकाशभाऊ जाधव यांनी गुरुजनांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना व्यक्त करत, "गुरुजनांच्या आशीर्वादामुळेच आम्ही आजही एक कुटुंब म्हणून सुख-दुःखात सहभागी होत आहोत. हे आमच्यासाठी खरे गुरूतीर्थ आहे," असे भावनिक मनोगत व्यक्त केले. त्यांनी उपस्थित गुरुजन, मान्यवर आणि सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कमलेश पांजरे यांनी केले. शेवटी सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेत जुन्या आठवणींना उजाळा देत परस्परांशी हितगुज साधले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकाशभाऊ जाधव, विजय डोणेकर, कमलेश पांजरे, अशोक पोटभरे, गोविंद जुनघरे, प्रदीप वानखेडे, शंकर राऊत, प्रेम रोडेकर, मोरेश्वर उके, नथुजी लंगडे, दिलीप येलमुले, उमराव पाटील, सुनील लाडेकर, प्रभाकर ताजने, सेवक माटे, जीवन लिल्हारे, सुधाकर सोनुले, ईश्वर कडबे, लताताई वंजारी, चंपाताई गजभिये, संघमित्रा खोब्रागडे, छायाताई भेलावे आदींनी विशेष परिश्रम घेतले.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या