Advertisement

संजीवनी नगर येथे आयुष्मान भारत कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद


संजीवनी नगर येथे आयुष्मान भारत कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद


नगरसेवक राकेश लांजेवार यांच्या पुढाकाराने नागरिकांना लाभ


कांद्री : - कांद्री नगर पंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक १७  संजीवनी नगर येथील अंगणवाडीत आयुष्मान भारत कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.


शिबिरामध्ये पात्र लाभार्थ्यांची आयुष्मान भारत कार्डासाठी नोंदणी करण्यात आली तसेच योजनेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. नागरिकांना आरोग्य विमा योजनेचा लाभ सहजपणे मिळावा यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.


यावेळी नगराध्यक्ष सुजीत पानतावणे ,नगरसेवक राकेश लांजेवार ,सौरभ घरडे, सोनू गौतम, नितेश लुहुरे, मनीष शंभरकर यांच्यासह अनेक नागरिकांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.


नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन पुढेही करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या