Advertisement

नीट परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतला आढावा

 


नीट परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी  कुमार आशीर्वाद यांनी  घेतला आढावा


जिल्ह्यातील १२ हजार ५१२ विद्यार्थी  देणार नीटची परीक्षा


नागपूर : - जिल्ह्यातील १२ हजार ५१२ विद्यार्थी येत्या २१ जून रोजी होणाऱ्या नीट परीक्षेसाठी तत्पर झाले असून या परीक्षा सुरळीत पार पडाव्यात व विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी विविध उपाययोजनांचा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद  यांनी आढावा घेतला. 


नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीस या परीक्षेचे शहर समन्वयक प्राचार्य अरविंदसिह ठाकुर, प्राचार्य फिरोजखान, सीआरपीएफ आणि सीआयएसएफचे वरिष्ठ अधिकारी, केंद्र प्रमुख उपस्थित होते.


विद्यार्थ्यांना परीक्षा  देण्यासाठी हॉलमध्ये पुरेसा प्रकाश, योग्य बैठक व्यवस्था, जनरेटरची व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि सुरक्षिततेच्या  दृष्टीने सर्व केंद्र प्रमुख व परीक्षा केंद्र ज्या संस्थांना दिले आहेत त्या संस्थांनी योग्यती  काळजी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.


कोणताही अनुचित प्रकार या परीक्षेसाठी होऊ नये या दृष्टीने १४ परीक्षा केंद्र हे सीआरपीएफ व  पोलीस आणि १६ केंद्र हे  सीआयएसएफ व  पोलीस यांच्या सुरक्षितेखाली ठेवण्यात आली आहेत .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या