तहसीलदार अभिजित देशमुख यांची धडक कारवाई पाच डंपर दोन जेसीबी जेरबंद
राजेश भांगे ठाणे
मुरबाड तहसीलदार अभिजित देशमुख यांनी धडक कारवाई केली असून पाच डंपर दोन जेसीबी जेरबंद करण्यात आले आहे.
मुरबाड तालुक्यातील आदिवासी भागात झाडघर पठार.माळ पठार. या भागात अनेक वर्षांपासून पासून मातीचा उत्खनन चालू होते पण चिरीमिरी मुळे या लोकांना वर कार्यवाही होत नसल्याने नागरिक हैराण झाले होते मात्र यावेळी तहसीलदार अभिजित देशमुख यांनी कडक भूमिका घेऊन पाच डंपर दोन जेसीबी यांच्यावर कायदेशीर कारवाई टोकावडे पोलिस ठाण्यात करण्यात आली असून बेकायदेशीर माती उत्खनन करणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्यात येणार असे तहसीलदार यांनी सांगितले आहे.


0 टिप्पण्या