Advertisement

खेडी गावातील नागपूर पोलिस भरती प्रक्रियेत यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे सत्कार




मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर खेडी गावातील तरुणांची पोलीस दलात झेप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून जंगी सत्कार!

खेडी-कन्हान (प्रतिनिधी): दिवास्वप्न न पाहता घेतलेली अपार मेहनत आणि प्रबळ जिद्दीच्या बळावर खेडी गावातील ६ गुणवंत विद्यार्थ्यांनी नागपूर पोलीस भरती प्रक्रियेत घवघवीत यश संपादन केले आहे. या यशामुळे त्यांनी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, गावाचे नाव लौकिक केले आहे. या यशाची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने या सर्व सत्कारमूर्तींचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि पेढे भरवून जाहीर सत्कार करण्यात आला.
अन् सत्कारमूर्तींचे डोळे पाणावले...
या पोलीस भरती प्रक्रियेत यश संपादन केलेले सत्कारमूर्ती *साहिल प्रकाश इंगळे, अभिषेक किशोर बरबटे, अमोल कवडूजी काळेमोरे, राकेश सुभाष कोचे, आचल नंदूजी इंगळे आणि पलक अशोक बंड* यांनी अपोलो करिअर अकॅडमी (नगरधन) येथे प्रवेश घेऊन आपल्या तयारीला सुरुवात केली होती. मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, "पोलीस भरती प्रक्रियेत यश मिळवणे सोपे नव्हते." आपला संघर्ष, घेतलेली अथांग मेहनत, अभ्यास आणि शारीरिक सराव याविषयी बोलताना उमेदवारांचे डोळे पाणावले होते आणि उपस्थितांचाही उर भरून आला होता. त्यांनी आपल्या या यशाचे श्रेय आई-वडील, प्राध्यापक आणि मित्रमंडळींना दिले.
प्रमुख पदाधिकार्‍यांची उपस्थिती
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नागपूर जिल्हाप्रमुख *पुरुषोत्तम मस्के* होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पारशिवनी तालुकाप्रमुख *रवींद्र चकोले , कन्हान शहर प्रमुख **भारत पगारे,
कांद्री शहर प्रमुख **सुरेश आंबीलडोके* आणि खेडी येथील *इंगळे जी* प्रामुख्याने उपस्थित होते.
*"ग्रामीण भागातील तरुण-तरुणींमध्ये मोठी गुणवत्ता असते. योग्य दिशा आणि जिद्दीच्या जोरावर ते कोणतीही शिखरं सर करू शकतात, हे खेडी गावातील या युवकांनी सिद्ध करून दाखवले आहे. पक्षाला आणि संपूर्ण जिल्ह्याला या पाखरांचा अभिमान आहे."*
पुरुषोत्तम मस्के (जिल्हाप्रमुख, शिवसेना उबाठा)



सोहळ्याचे नेटके नियोजन:
कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन प्राध्यापक *रामेश्वर नागपुरे* यांनी केले, तर प्रास्ताविक उपसरपंच *इंगळे* यांनी मांडले. उपस्थितांचे आभार *आशिष कोचे* यांनी मानले.
या आनंदोत्सवात खेडी गावातील ज्येष्ठ नागरिक

देवराव इंगळे, रामदास कडू नंदू इंगळे, जगदीश इंगळे, आशिष कोचे, विजय ठाकरे, श्रीकांत चौधरी मंगेश कडू, कृष्णा काठोके, नामदेव वैद्य, कवडू नागपुरे, पांडुरंग घरजळे, रोशन इंगळे, शंकर काळे, गजानन काळे, प्रभू अंबळकर, राजू नागपुरे, नंदू कोचें आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

सहसंपादक ऋषभ बावनकर

पुढाकार समाचार कन्हान -नागपूर

 
Felicitations by the Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) party for meritorious students from Khedi village who achieved success in the Nagpur Police recruitment process.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या