नागपुर ते श्रीक्षेत्र रामटेक पायदळ वारीचे कांद्री- कन्हान येथे स्वागत
कन्हान : - सर्वश्री वारकरी सांप्रदाय दिंडी सोहळा नागपुर व्दारे श्री संत ज्ञानेश्वर मंदिर जूनी मंगळवारी, नागपुर ते श्री क्षेत्र रामटेक पायदळ वारीचे कन्हान शहरात आगमण होताच भव्य स्वागत करून संताजी सभागृह कांद्री-कन्हान येथे किर्तन , भोजन करून रात्री मुक्काम करून सकाळी पायदळ वारी रामटेक कडे प्रस्थान करण्यात आले .
The walking pilgrimage from Nagpur to Shrikshetra Ramtek was welcomed at Kandri-Kanhan.
मंगळवार (दि.२४) मार्च रोजी सायंकाळी सर्वश्री वारकरी सांप्रदाय दिंडी सोहळा नागपुर व्दारे २३ व्या वर्षी श्री संत ज्ञानेश्वर मंदिर जूनी मंगळवारी, नागपुर ते श्री क्षेत्र रामटेक (दि.२३ ते २७ मार्च) पायदळ वारीचे कन्हान शहरात सायंकाळी आगमण होताच कन्हान-कांद्री शहरात जल्लोषात भव्य स्वागत करण्यात आले . श्री संताजी सभागृह कांद्री-कन्हान येथे जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई चा जल्लोष होऊन ह.भ.प. लोडेकर महाराज कन्हान यांचे किर्तन करून पायदळ वारी प्रमुख ह.भ.प. सुरेंद्र बुवा निंबुळकर , पांडुरंग पंत तांबुसकर , प्रमोद हिवरे , भारत ठाकरे , रवि गावंडे , लताबाई गावंडे , सुवर्णाताई वानखेडे यांचे स्वागत तेली समाज कन्हान कांद्री संस्थेच्या वतीने करण्यात आले . त्यानंतर प्रसाद वाटप आणि सर्व भाविकांचे भोजन करून रात्री मुक्काम करण्यात आला. बुधवार (दि.२५) मार्च ला पहाटे सकाळी पुजा अर्चना करून सर्वश्री वारकरी सांप्रदाय दिंडी सोहळा नागपुर व्दारे संताजी सभागृह आणि तेली समाज कन्हान - कांद्री च्या पदाधिकाऱ्यांना नारळ पान देऊन आभार व्यक्त करण्यात आले . नंतर पायदळ वारीचे रामटेक कडे प्रस्थान करण्यात आले .
कार्यक्रमाच्या यशस्विते करिता श्री संताजी स्मृती सभागृह कन्हान-कांद्री अध्यक्ष मा.शरद डोणेकर , उपाध्यक्ष माधवराव मरघडे , वसंतराव कांबळे , संपर्क प्रमुख वामनराव देशमुख , सचिव अशोक हिंगणकर , कार्याध्यक्ष पुरुषोत्तम बेले व कार्यकारी मंडळ मनोहर कोल्हे , महादेव किरपान , लक्ष्मीकांत गिरडकर , शिवाजी चकोले , चंद्रशेखर बावनकुळे , अल्का कोल्हे , मंगला हटवार , अपूर्वा हिंगणकर , जयश्री मरघडे , कल्पना देशमुख , गीता सरोदे आदी सह सदस्यांनी सहकार्य केले .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या