Advertisement

चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती उत्साहाने साजरी


चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती उत्साहाने साजरी


धम्म रॅलीचे आयोजन , कन्हान मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम


कन्हान : - कन्हान शहरात केसीएस लामा चॅरिटेबल ट्रस्ट भारत नागपुर यांच्या वतीने प्रियदर्शी चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . सिद्धार्थ कॉलनी बुद्ध विहारात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले . 

The birth anniversary of Emperor Ashoka was celebrated with great enthusiasm.

गुरूवार (दि.२६) मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता 'कौन छौन सौनाम लामा चॅरिटेबल ट्रस्ट'चे संस्थापक अध्यक्ष भदंत आर्य के.सी.एस लामा महाथेरो यांच्या हस्ते बोधिसत्व चक्रवर्ती राजा सम्राट अशोक व महाकारुणिक तथागत बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पणा सह रॅलीला सुरूवात करण्यात आली . धम्म रॅली महामार्ग क्र.४४ चे भ्रमण करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान , सधंम्म बुद्ध विहार रेल्वे स्टेशन रोड येथे पोहचली . विहारात तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन तारसा चौक , गहु हिवरा रोड चौक , पांधण रोड , रॅलीचा सिद्धार्थ कॉलोनी गणेश नगर बुद्ध विहारात पोहचुन समारोप झाला . सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकल्यांनी राजा सम्राट अशोक यांच्या जीवनीवर विशेष भाषणे केली . भगवान नितनवरे , प्रभुदास धनविजय यांनी राजा सम्राट अशोकाचा जीवनपट भाषणातुन प्रगट केला . संचालन राजेश फुलझेले यांनी तर आभार गौतम खंडारे यांनी मानले . बुद्धीस्ट वेलफेअर सोसायटी व समता सैनिक दल कन्हान , अखिल भारतीय भिक्खु महासंघ , सम्राट अशोक जयंती समारोह समिती कन्हान यांनी बुध्द वंदना घेवुन प्रियदर्शी चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांच्या छायाचित्रांचे वाटप केले . स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .



याप्रसंगी विनायक वाघधरे , पुंडलिक मानवटकर , दौलत ढोके , महेंद्र चव्हाण , राजेश फुलझले , संजय चंहादे , नितीन मेश्राम , रोहित मानवटकर , नगराध्यक्ष राजेंद्र शेंद्रे , नगरसेवक केतन भिवगडे , नगरसेविका सुचित्रा माटे , नगरसेविका पूनम राठी , मयुर माटे , पंकज रामटेके , अश्वमेघ पाटील , रजनीश बाळा मेश्राम , अभिजित चांदुरकर , संदिप शेंडे , चंद्रशेखर डोंगरे , गौतम खंडारे , प्रविण चांदुरकर , नितेश टेंभुर्णे , रत्नदीप गजभिये , बादल सहारे , जितु टेंभुर्णे , गुड्डू ठाकुर , आनंद चव्हाण , शैलेश दिवे ,आदित्य टेंभुर्णे , निशांत मोटघरे , वंदना ढोके , अनिता डोंगरे , अस्मिता डोंगरे , सुनंदा बारमाटे , विजया निकोसे ,कमल गटपाडे , बबीता मानवटकर , वनंंदा टेंभुर्णे , दुर्गा गजभिये , अर्चना चव्हाण, अनिता दुपारे , मनुकला वाघमारे , वैजयंती पाटील , ज्योती मोटघरे , रुक्मिणी बनसोड , दुर्गा निकोसे , मालती कोल्हाटकर , जिजा मानवटकर , अर्चिता फुलझेले, सुनिता वासनिक , भावना टेंभुर्णॆ , आदी सह बौद्ध उपासक , उपासिका बहु संख्येने उपस्थित होते .


सम्राट अशोक हे या देशातील महान सम्राट होते- भदंत लामा महाथेरो 


सम्राट अशोक राजाने मानवतेच्या कल्याणा साठी आपल्या राज्यात लोककल्याणकारी योजना राबविल्या . त्यांच्या राज्यात सुख , समृद्धी नांदत होती . त्यांनी लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली . विश्वाला दया , करुणा , शांती आणि मैत्रीचा संदेश दिला . सम्राट अशोक हे या देशातील महान सम्राट होते ,  बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला . भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या मानवतेच्या कल्याणाचे कार्य पुढे नेले . असे प्रतिपादन भदंत आर्य के.सी.एस लामा महाथेरो यांनी केले .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या