Advertisement

अग्निशस्त्र बाळगणाऱ्या तरुणाला पोलीसांनी पकडले


अग्निशस्त्र बाळगणाऱ्या तरुणाला पोलीसांनी पकडले


अग्निशस्त्र काडतुसासह ४७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त


स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोलीसांची कामगिरी


कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत गहुहिवरा पुलिया जवळ देशी बनावटीचे अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोलीसांनी पकडले . कारवाईत अग्नीशस्त्र व दोन जिवंत काडतुसासह ४७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .

Police apprehend youth in possession of a firearm.

प्राप्त माहितीनुसार बुधवार (दि.१) एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पोलीस कन्हान परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गोपनिय माहीती मिळाली की, कन्हान गहुहिवरा पुलीया जवळ एक तरुण देशी बनावटीचे अग्नीशस्त्र बाळगुन कोणत्यातरी हस्तक्षेपनीय गुन्हा करण्याचे उद्देशाने फिरत आहे . अश्या मिळालेल्या माहिती नुसार पोलीसांनी गहुहिवरा रोड जवळील हायवे पुलाजवळ सापळा रचला असता , एक तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसुन आला . पोलीसांना पाहुन त्याने पळ काढला . त्याच्या वरील संशय अधिक बळावल्याने त्याला  पकडण्यात पोलीसांना यश आले . आरोपी अजीत राजू मनहरे , (वय २४) रा.कामठी कॉलनी खदान नं.३ याची अंगझडती घेतली असता कमरेला देशी बनावटीचे पिस्टल (माउजर) हे अग्निशस्त्र मिळुन आले. अग्निशस्त्राच्या मॅगझीन मध्ये २ जिवंत काडतुसे मिळुन आली. सदर अग्निशस्त्राच्या परवान्याबाबत विचारपुस केली असता त्याचे जवळ कोणताही परवाना नसल्याची माहीती प्राप्त झाली . 

पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन देशी बनावटीचे पिस्टल (माउजर) किंमती ४५,००० रूपये , २ जिवंत काडतुसे किंमती २००० रूपये असा एकुण ४७,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे . या प्रकरणी आरोपी विरूद्ध पोलीस स्टेशन कन्हान येथे कलम ३/२५ शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे . नमुद आरोपीस पोलीसांनी अटक केली असुन साखळी पुरावे जोडुन पोलीस अधिक तपास करीत आहेत.


सदरची कारवाई नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार , अप्पर पोलीस अधिक्षक अनिल मस्के यांचा मार्गदर्शनात , स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या नेतृत्वात सपोनी किशोर शेळकी , एएसआई विनोद काळे , पोहवा प्रमोद भोयर , पोना संजय बरोदिया , पोशी अभिषेक देशमुख , आशुतोष लांजेवार सह आदि पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या