Advertisement

दुकानाचे शटर फोडणाऱ्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकास पोलीसांनी पकडले


दुकानाचे शटर फोडणाऱ्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकास पोलीसांनी पकडले


४ गुन्हे उघड , दोन दुचाकी वाहना सह ८४,१४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त , कन्हान पोलीसांची कामगिरी 


कन्हान : - कन्हान शहराच्या महामार्गा वरील डोणेकर सभागृहा जवळील विजय कॉम्प्लेक्स मध्ये सलग दोन दुकानाचे शटर फोडणाऱ्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकास कन्हान पोलीसांनी पकडले . कारवाई दरम्यान एकुण ४ गुन्हे उघडकीस आणुन दोन दुचाकी वाहना सह ८४,१४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .


पोलीसांन कडुन मिळालेल्या माहिती नुसार , फिर्यादी अंकीत विजय कालरा (वय ३८) रा.जवाहर नगर , स्टेट बँकचे मागे कन्हान, यांनी रिपोर्ट दिली की , विजय कॉम्प्लेक्स, अॅक्सीस एटीएम चे बाजुला, अशोक नगर कन्हान येथे दुध डेअरी ची दुकान आणि फिर्यादीच्या दुकानाचे बाजुला ७ नंबर चे दुकान सिरील पॉल की फिश या दोन दुकानाचे शटर वाकवुन अज्ञान चोरट्यांनी दोन्ही दुकानातुन एकुण ८७५०/- रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे . अश्या फिर्यादीच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३०३(२), ३३१ (४), ३(५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

Police Apprehend Two Juveniles in Conflict with the Law for Breaking Open Shop Shutter

नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष ए.पोद्दार , अप्पर पोलीस अधिक्षक अनिल म्हस्के , उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस तपास करीत असतांना बुधवार (दि.१) एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता कन्हान पोलीसांना रात्री पेट्रोलींग दरम्यान आंबेडकर चौक येथे दोन विधीसंघर्षग्रस्त बालक हे संशयीत रित्या फिरतांना मिळुन आले . विधीसंघर्षग्रस्त बालक यांना विश्वासात घेवुन त्यांच्याकडे कौशल्यपुर्ण तपास करीत गुन्ह्यासंबंधाने विचारपूस केली असता त्यांनी पोलीस स्टेशन कन्हान हद्दीत घरफोडी व नागपूर शहर पोलीस स्टेशन कोराडी, गिट्टीखदान, कपिल नगर परिसरात घरफोडी तसेच मोटर सायकल चोरी केल्याचे कबुल केले . पोलीसांनी दोन्ही बालकांना ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन २ वेगवेगळ्या कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल किंमत २०,००० रुपये , २ मोटरसायकल किंमत ५०,००० रूपये , एक पेन ड्राईव्ह किंमत ३५० रूपये ,  एक कॅनरा बँक चेक किंमत ७०,००० रूपये ने भरलेला ,  एक अॅमेरॉन बॅटरी वारंटी कार्ड , रोख रक्कम १३,७९५ रूपये असा एकूण ८४,१४५/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . 


सदरची कारवाई नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष ए.पोद्दार , अप्पर पोलीस अधिक्षक अनिल म्हस्के , उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे , पोउपनि एकनाथ राठोड , पोहवा हरिष सोनभद्रे , अमित यादव , पोशि आकाश सिरसाट , पवन भेडारकर , चापोशि वैजनाथ तौडेवार , आशिष बोरकर , राहुल जाधव सह आदि पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या