तारसा रोड वर जीव घेणे खड्डे, जिल्हाधिकारी यांना निवेदन
Kanhan: कन्हान शहर मधील M.G. नगर जवळच्या महामार्ग पुलाच्या खाली, मोठमोठे खड्डे
झाल्यानी, रात्रीच्या
वेळेस होत आहे भीषण अपघात, तसेच तारसा रोड वरील वानखेडे हॉस्पिटल समोर RCC
रोड, वर-खाली झाल्यानी
नागरिकांची होत आहे तारेवरची कसरत.
नागपूर जिल्हाधिकारी, यांना सविनय व माहिती सादर, करण्यात आली.
कन्हान शहर मधील M.G. नगर च्या तरसा रोड वर
महामार्ग ४४ च्या पुलाच्या खाली कुठलेहि विद्युथ दिवे नाही, ह्या कारणांनी पुलाच्या खाली
खड्डे झालेले दिसत नसल्यानी मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. त्या
ठिकाणी भरपूर अपघात होऊन, झाले आहे.
रात्रीच्या काळोख अंधारात बाईक किंवा कार चालकांना अंदाज येत नाही कि पूलच्या खाली मोठ-मोठे खड्डे आहेत. कारण कन्हान ते तारसा पर्यत RCC रोड तयार करण्यात आला आहे.
त्या कारणांनी चालकांच्या मनात असा संभ्रम निर्माण होतो कि संपूर्ण रोड
एकसारखा सपाट आहे! पण असे अंदाज सुटल्याने अपघाताला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली
आहे.
इतके अपघात होऊनही NHAI.
म्हणतात आमच्या
हद्दीत नाही, PWD, म्हणतो आमच्या हद्दीत नाही, मग हद्द आहे कोणाची, रोड तयार कोणी केले ? मग हि जागा कोणाची
नाही तर अपघात झालेल्या नागरिकांच्या भरपाई साठी हि जागा विक्री करून त्यांना
नुकसान भरपाई द्यावी का साहेब? मा.
जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती करून तारसा रोड हा मार्ग कोणत्या
खात्याखाली येतो. ह्याचा पाठ पुरावा करून, लवकरात लवकर तारसा रोड वरील खालील रस्त्याचे व वानखेडे
हॉस्पिटल समोरील RCC
रोड!
वर-खाली झाला आहे, ह्या रोड ची तपासणी करून! डागडुजी करून देण्यात यावी.
जर १० दिवसाच्या आत ह्या नगरीक समस्याचे
निराकरण झाले नाही तर आम्ही शिवसेना पक्ष तर्फे आंदोलन करू, ! ह्यात सर्वस्व प्रशासन
जिम्मेदार राहील. ह्याची आपणा दक्षता घ्यावी, असे निवेदन सादर करण्यात आले.


0 टिप्पण्या