कल्याण आहिल्यानगर हायवेवर पुन्हा एक अपघात झालेची घटना घडली आहे
कल्याण नगर हायवेवर किशोरगाव येथे मोटारसायकल ट्रक धडकेत एक जण गंभीर झालेची घटना घडली असून अपघाताची मालिका संपत नाही.
कल्याण नगर हायवेवर किशोरगाव येथील नाक्यावर पुन्हा एक भिषण अपघात घडला आहे मोटारसायकल स्वार आणि ट्रक यांची समोरा समोर जोरदार धडक होऊन मोटारसायकल स्वार गंभीर झाला आहे मुरबाड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
या घटनेमुळे काही वाहतूक कोंडी झाली होती अपघातांचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे दरम्यान या मार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे दोन दिवसांपूर्वी रायते पुलावर झालेल्या अपघातामुळे 11 जणांचा मृत्यू झाला होता.आणि त्यानंतर प्रशासनने या मार्गावर कडक कारवाई आणि तपासणी मोहीम सुरू केली आहे गाडीचे वेग कमी होत नाही तोपर्यंत असेच कुठे ना कुठे अपघाताची मालिका सुरू राहणार असं बोललं जातं आहे.
Another accident has occurred on the Kalyan-Ahilyanagar Highway.
राजेश भांगे ठाणे


0 टिप्पण्या