Advertisement

नागपूर रविभवन येथे जागतिक ग्राहक दिवस उत्साहात साजरा


नागपूर रविभवन येथे जागतिक ग्राहक दिवस उत्साहात साजरा


बी.आय.एस. व ग्राहक पंचायत महाराष्ट्र विदर्भ प्रांत" यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन 


नागपूर : - बी.आय.एस. व ग्राहक पंचायत महाराष्ट्र विदर्भ प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ग्राहक दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दिनांक १६ मार्च रोजी नागपूर रविभवन येथे करण्यात आले .


कार्यक्रमाची सुरुवात बिंदू माधव जोशी नाना यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली . कार्यक्रमाचे प्रस्ताविक ग्राहक पंचायत महाराष्ट्र नागपूर ग्रामीण अध्यक्ष कांचनमाला माकडे यांनी केले . त्यांनी प्रस्ताविकेतुन ग्राहक पंचायतीची सुरुवात कशी झाली व ग्राहक संरक्षण कायदा 1986 कशाप्रकारे अस्तित्वात आला त्याबाबत मार्गदर्शन केले . तसेच बिंदू माधव जोशी यांचे कार्य विशद करण्यात आले . भारतीय मानक ब्युरो अधिकारी" रोनक सुखदेवे यांचा  संबंधी इत्यभूत विस्तृत माहिती दिली . 

भारतीय मानक ब्युरो प्रचार प्रमुख इशा खुराना यांनी आय.एस.आय मार्क , हॉलमार्क , स्टॅंडर्ड मानक , याविषयी व प्रचार प्रसाराच्या माध्यमातून डिजिटल माहिती दिली . संघटक ग्राहक पंचायत महाराष्ट्र विदर्भ प्रांत डॉक्टर कल्पना उपाध्याय यांनी ग्राहक पंचायत आणि भारतीय मानक ब्युरो च्या कार्याचा एकमेकांशी कशा प्रकारे संबंध येतो . त्याचबरोबर भारतीय मानक ब्युरो ला ग्राहक पंचायतीच्या  मागण्या काय आहेत ते या माध्यमातून विषद केल्या .

World Consumer Day Celebrated with Enthusiasm at Ravibhavan, Nagpur

कार्यक्रमाचे अध्यक्ष शामकांत पात्रीकर विदर्भ प्रांत अध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांनी संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा आपल्या अध्यक्षीय भाषणात घेतला . स्टॅंडर्ड हे तो सही है असा नारा त्यांनी यावेळी दिला . कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन निकेश कावळे यांनी केले . कार्यक्रमाला नागपूर ग्रामीण पदाधिकारी श्रीराम सातपुते , पारशिवनी तालुका अध्यक्ष सुनीता मानकर , पारशिवनी तालुका सचिव सूर्यभान चकोले , रामटेक तालुका संघटक बबीता कोठेकर , सोनेघाट अध्यक्ष मीना इंदुरकर सहित नागपूर जिल्हा व विविध तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या