कन्हान - कांद्री परिसरात चोऱ्यांचा सुळसुळाट ; बंदोबस्ताची मागणी
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण , भाजपचे पोलीस प्रशासनाला निवेदन
कन्हान : - कन्हान शहर आणि कांद्री परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे . या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी भाजप कन्हान मंडळाचे महामंत्री सचिन अशोक वासनिक यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांना निवेदन देण्यात आले .
Thieves are rife in Kanhan-Kandri area; Security demanded
निवेदन पत्रात सांगितले कि , कन्हानमधील मुख्य ठिकाणांवर चोरट्यांचे सत्र सुरू झाले आहे . महामार्गाच्या डोनेकर सभागृहा जवळील विजय काॅमप्लेस मध्ये मंगळवार ते बुधवार पहाटे रोजी चोरट्यांनी एकाच रात्री आईस्क्रीम पार्लर आणि सिरील पाॅलची फिश पाॅलच्या दुकानाचे शटर फोडुन ८,७५० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला .
त्याच रात्री रायनगर येथील छोटी किराणा दुकानातुन चिल्लर पैसे चोरुन नेले असुन बेलेकर यांच्या निवासस्थानीही चोरी करण्याचा प्रयत्न केला . तर भाजपा कन्हान शहर युवा मोर्चाचे महामंत्री नरेश आर. बी. यांचा घरासमोरुन पहाटे ४:३० वाजता च्या दरम्यान होंडा ॲक्टिव्हा दुचाकी वाहन चोरीला गेली . कांद्री येथील गजानन मंदिर परिसरात वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे निवेदन पत्रात उल्लेख केले आहे .
कन्हान , कांद्री परिसरात मागील काही दिवसान पासुन सतत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने भाजपा पदाधिकार्यांनी पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांची भेट घेतली आणि निवेदन पत्र देऊन कन्हान आणि कांद्री परिसरातील संवेदनशील भागात रात्रीची पोलीस ग्रस्त वाढवण्यात यावी , परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी करून गुन्हेगारांचा तातडीने छडा लावावा , पहाटेच्या सुमारास होणाऱ्या वाहन चोऱ्या रोखण्यासाठी विशेष पथक तैनात करावे अशी मागणी केली आहे .
निवेदनात राहुल वंजारी , राजेश पोटभरे , शिवगोपाल यादव , पवन यादव , नितेश कांबळे , नरेश आराबी सह आदि पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने तक्रारीची दखल घेऊन त्वरित ठोस पावले न उचलल्यास उग्र आंदोलनाचा इशारा ही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या