Advertisement

सरस्वती न्यू इंग्लिश शाळेत मराठी भाषा गौरव दिवस उत्साहात साजरा


सरस्वती न्यू इंग्लिश शाळेत मराठी भाषा गौरव दिवस उत्साहात साजरा


कन्हान : - सरस्वती न्यू इंग्लिश शाळा कन्हान येथे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जयंतीचे औचित्य साधुन मराठी भाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .


कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष पी.जी.खेरगडे सर , शाळेचे मुख्याध्यापक विक्की इंगोले सर प्रामुख्याने उपस्थित होते .

Marathi Language Pride Day celebrated with enthusiasm at Saraswati New English School

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला यांच्या पुष्प हार अर्पण करुन अभिवादन करीत कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . यावेळी पी.जी.खेरगडे सर यांनी कुसुमाग्रज यांचा जीवन कार्यावर शिक्षकांना , विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . तसेच शाळेत विविध नाटक , अभंग मराठी भाषेवरील आपुलकी व जिव्हाळा कसा प्रमाणे राहील याची विद्यार्थांनी प्रस्तुती केली . कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभार प्रदर्शन अर्पणा पाटील यांनी केले . या प्रसंगी प्रणय सर , दिक्षा मॅडम अंकिता मॅडम प्रामुख्याने उपस्थित होते .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या