Advertisement


कन्हान परिसरात होळीचा सण उत्साहाच्या वातावरणात साजरा


ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीने होळी प्रज्वलित


पोलीसांच्या कडेकोट बंदोबस्त , ड्रंक अॅंड ड्राईव करणाऱ्या चालकांवर कारवाई 



कन्हान : - कन्हान शहरात व ग्रामीण भागात होळी व धुलिवंदन उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला .


सोमवारी होळी पौर्णिमा सणानिमित्त कन्हान  , कांद्री , टेकाडी , खदान , केरडी , वराडा , यसंबा  , सालवा , वाघोली , निलज , खंडाळा , या सह इतर ठिकाणच्या गावागावात पारंपारिक पद्धतीने होळी उभारण्यात आल्या होत्या .


यावेळी महिलांनी , पुरुषांनी धार्मिक विधीपुर्वक होळीचे पुजन करुन जेष्ठ नागरिकांच्या हस्ते होळी प्रज्वलित करण्यात आले . मंगळवारी धुलिवंदन च्या दिवशी  गुलालाची उधळण करत , पारंपरिक ढोल - ताशांच्या गजरात नागरिकांनी एकमेकांना रंग लावून होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला . वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेला हा सण सामाजिक एकोपा आणि प्रेमाचा संदेश देणारा ठरला . 

Holi festival celebrated in an atmosphere of enthusiasm in Kanhan area


होळी सणाच्या पार्श्वभुमीवर कन्हान शहरात मुख्य ठिकठिकाणी पोलीसांच्या कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला . कन्हान उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ संतोष गायकवाड , कन्हान पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात पोलीसांनी मुख्य मार्गावर नाकाबंदी केली . दरम्यान ड्रंक अॅंड ड्राईव करणाऱ्या चालकांवर कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात आला . पोलीसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता होळीचा सण उत्साहाच्या वातावरणात पार पडला .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या